पतीच्या बचावासाठी पुढे आली दिव्य कुमार खोसला सोनू निगमला म्हणाली, अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का..'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2020 10:44 IST2020-06-23T10:44:03+5:302020-06-23T10:44:49+5:30

सोशल मीडियाच्या माध्यमातून दिव्याने सोनच्या धमकीचे उत्तर दिले आहे.

Divya kumar khosla reacts on sonu nigams allegations on bhushan kumar | पतीच्या बचावासाठी पुढे आली दिव्य कुमार खोसला सोनू निगमला म्हणाली, अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का..'

पतीच्या बचावासाठी पुढे आली दिव्य कुमार खोसला सोनू निगमला म्हणाली, अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का..'

गायक सोनू निगमने नुकताच एक व्हिडिओ शेअर करुन टी- सीरिजचे मालक भूषण कुमारवर निशाणा साधला होता. सोनू निगमने भूषण कुमारवर टीका करणारा व्हिडीओ त्याच्या फेसबुक अकाऊंटवर पोस्ट केला होता. आता यावर  भूषण कुमारची पत्नी आणि अभिनेत्री दिव्य कुमार खोसलाची प्रतिक्रियासमोर आली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून दिव्याने सोनच्या धमकीचे उत्तर दिले आहे. 

दिव्याने एकापाठोपाठ एक अशा दोन स्टोरी शेअर केल्या आहेत ज्यात तिने सोनू निगमच्या यशात टी-सीरिजचा सिंहचा वाटा असल्याचे ती सांगतेय.  

दिव्या लिहिते, ''सध्याचे सत्य केवळ एवढेच आहे की कोण चांगले कॅपेन चालवू शकतो. मी बघतेय की लोक खोटंसुद्धा पसरवू शकतात या कॅपेनच्या माध्यमातून. सोनू निगम एक असा व्यक्ती आहे ज्याला प्रेक्षकांच्या भावनांशी चांगले खेळता येते. देव आमच्या जगाचे रक्षण कर.''

पुढच्या पोस्टमध्ये ती लिहिते, 'सोनू निगमजी टी-सीरिजने तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये ब्रेक दिला होता. तुला ऐवढे यश मिळवून दिले. जर तुला भूषण कुमारसोबत काही समस्या होती तर तू हे आधी का नाही बोललास. आज पब्लिसिटीसाठी तू हे सगळे का करतो आहेस.  

काय म्हणाला सोनू

‘लातों के भूत बातों से नहीं मानते...’ अशी सुरूवात करत सोनूने भूषण कुमारची पोलखोल केली आहे. ‘मी खूप चांगल्या पद्धतीने बोललो होतो, की तुम्ही नवीन कलाकारांसोबत प्रेमाने वागा, केवळ एवढाच सल्ला मी दिला होता. एखाद्याच्या आत्महत्येनंतर विचार करण्यापेक्षा अशी घटना घडण्यापूर्वी बदललेले केव्हाही चांगले, हे मला सुचवायचे होते. अर्थात माफिया बदलणारे नाहीत. माफिया माफियाचाच डाव खेळणार. मी कोणाचेच नाव घेतले नव्हते, पण माझे नाव मात्र घेतले जातेय. त्यांनी माझ्या विरोधात बोलण्यासाठी पाच-सहा जणांच्या मुलाखती घेतल्या. याच पाच-सहा जणांपैकी एकाच्या भावाने दीड वषार्पूर्वी एक ट्विट केले होते

Read in English

Web Title: Divya kumar khosla reacts on sonu nigams allegations on bhushan kumar