दिशा पटानी पुन्हा झाली ट्रोल, ट्रान्सपरंट ड्रेस बघून यूजर्स म्हणाले - 'हिला तर ड्रेसिंग सेन्सच नाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2018 21:00 IST2018-12-20T21:00:00+5:302018-12-20T21:00:00+5:30

'एम.एस. धोनी - द अनटोल्ड स्टोरी' या सिनेमातून दिशाने हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं होतं. त्याआधी 'लोफर' या तेलुगू सिनेमातून दिशाने अभिनयाची इनिंग सुरु केली होती.

Disha Patani Trolled For Her Dressing Sense On Social Media | दिशा पटानी पुन्हा झाली ट्रोल, ट्रान्सपरंट ड्रेस बघून यूजर्स म्हणाले - 'हिला तर ड्रेसिंग सेन्सच नाही'

दिशा पटानी पुन्हा झाली ट्रोल, ट्रान्सपरंट ड्रेस बघून यूजर्स म्हणाले - 'हिला तर ड्रेसिंग सेन्सच नाही'

सध्या दिशा पटानी तिच्या करिअरमुळे नाही तर खासगी आयुष्यातील घडामोडींमुळेच जास्त चर्चेत असते. काही दिवसांआधी  दिशा पटानी उदास होऊन मुंबईतल्या रस्त्यावर एकटीच फिरत असल्याचे पाहायला मिळाले. मात्र यावेळी तिचा बोल्ड अंदाजही तिच्या फॅन्ससाठी चर्चेचा विषय ठरला होता. आता पुन्हा एकदा दिशा चर्चेत आली आहे. यासाठी कारणीभूत ठरला आहे तिचा हा फोटो.सोशल मीडियावर हा फोटो अपलोड होताच नेटीझन्सने मात्र संमिश्र प्रतिक्रीया द्यायला सुरूवात केल्याचे पाहायला मिळाले. तर दुसरीकडे  सोशल मीडियावर दिशाची चांगलीच खिल्ली उडवली जात आहे. तर यूजर्सनी म्हटले,‘हिला तर ड्रेसिंग सेन्सच नाही.’ 

सध्या सोशल मीडियावर अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींना  अनेक वेळा त्यांच्या फॅशन एक्सपेरिमेंटविषयी ट्रोल केले जाते. असेच काही आता दिशाबद्दलही झाल्याचे पाहायला मिळत आहे.एका यूजरने कमेंट करताना लिहिले आहे की, 'कायम ही विचित्र ड्रेस परिधान करत असते.' एक कमेंट आली की- 'सार्वजनिक ठिकाणी हजेरी लावत असताना कसे कपडे घालावे, हे जरा हिले कुणी शिकवले पाहिजे.'

 

दिशाल ट्रोल करण्याची ही काही पहिली वेळ नाही याआधीही तिची खिल्ली उडवण्यात आली होती. दिवाळीत दिशाने इन्स्टाग्राम तिचा एक फोटो पोस्ट केला होता. या फोटात तिने लाईट क्रिम रंगाचा लहेंगा घातला आणि त्यावर त्याच रंगाची ओढणी घेतली आहे आणि तिच्या हातात दिवा होता. पण या लहेंगावर तिने ब्लॉऊज घालण्याऐवजी स्पोटर्स ब्रा घातली होती. त्यामुळे नेटिझन्सने तिची चांगलीच खिल्ली उडवली होती. दिशाने दिवाळीच्या निमित्ताने हा फोटो शेअर केला असला तरी तिने त्यासोबत काहीही कॅप्शन शेअर केलेले नव्हते. पण तिचा हा फोटो पाहून नेटिझन्स चांगलेच संतापले होते. दिशा तू ब्लॉऊज घालायला विसरलीस का, तू यात खूपच वाईट दिसत आहेस... दिवाळीला तरी चांगले कपडे घालत जा, स्पोटर्स ब्राला ब्लाऊजसारखे कोण घालतं का, फोटो क्लिक करण्याआधी कपडे घालायला विसरलीस का यांसारख्या चित्रविचित्र प्रतिक्रिया दिशाच्या फॅन्सने तिच्या फोटोवर दिल्या होत्या.


'एम.एस. धोनी - द अनटोल्ड स्टोरी' या सिनेमातून दिशाने हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं होतं. त्याआधी 'लोफर' या तेलुगू सिनेमातून दिशाने अभिनयाची इनिंग सुरु केली होती. जॅकी चॅनसह 'कूंग फू योगा' या सिनेमातही दिशाने काम केलं होतं. 'बागी-२' सिनेमातही दिशाच्या अभिनयाची जादू पाहायला मिळाली. 'बागी-२' मध्ये दिशा आणि टायगर श्रॉफची जोडी रसिकांना भावली होती. दिशा सलमान खानच्या भारत या चित्रपटात सलमानच्या बहिणीची भूमिका साकारणार आहे. 


  

Web Title: Disha Patani Trolled For Her Dressing Sense On Social Media