दिशा पाटनीची ‘दशा’! पुन्हा झाली ट्रोल; युजर्स म्हणाले, प्रयत्न कर नक्कीच अभिनेत्री बनशील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2021 14:23 IST2021-03-25T14:22:17+5:302021-03-25T14:23:37+5:30

हॉट अदा दाखवण्यासोबत थोडी अ‍ॅक्टिंगही शिक, असे म्हणत सोशल मीडिया युजर्सनी दिशाला ट्रोल केले.

disha patani shares a stunning picture from her beach vacation but trolled by netizens | दिशा पाटनीची ‘दशा’! पुन्हा झाली ट्रोल; युजर्स म्हणाले, प्रयत्न कर नक्कीच अभिनेत्री बनशील 

दिशा पाटनीची ‘दशा’! पुन्हा झाली ट्रोल; युजर्स म्हणाले, प्रयत्न कर नक्कीच अभिनेत्री बनशील 

ठळक मुद्देयाआधी दिशाने असेच दोन फोटो शेअर केले होते. त्या फोटोंवरूनही ती अशीच ट्रोल झाली होती.

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी तिच्या बोल्ड फोटोंमुळे सतत चर्चेत असते. काल रात्री दिशाने असाच एक ब्राऊन बिकिनीतील बोल्ड फोटो शेअर केला. पण तिचा हा फोटो पाहून अनेकांनी तिला ट्रोल करणे सुरु केले.
दिशा तिच्या परफेक्ट फिगरसाठी ओळखली जाते. ही फिगर फ्लॉन्ट करण्यात दिशाही कोणतीच कसर सोडत नाही. आत्मविश्वासाने ती ही फिगर फ्लॉन्ट करते. पण आता कदाचित चाहत्यांना याचाही कंटाळा आला असावा. त्यामुळेच हॉट अदा दाखवण्यासोबत थोडी अ‍ॅक्टिंगही शिक, असे म्हणत सोशल मीडिया युजर्सनी तिला ट्रोल केले.

अ‍ॅक्टिंग शिकून घे, तू अ‍ॅक्ट्रेसही बनू शकतेस, असे एका युजरने लिहिते. तुझ्याकडे इतके पैसे आहेत, मग कपडे का घालत नाहीस, असे लिहित एका युजरने तिला ट्रोल केले.  

याआधी दिशाने असेच दोन फोटो शेअर केले होते. त्या फोटोंवरूनही ती अशीच ट्रोल झाली होती. इतकी की, काही युजर्सनी तिची तुलना थेट आमिर खानशी केली होती.   दिशाने ट्विटरवर दोन फोटो शेअर केले होते.

या फोटोंमध्ये दिशा अ‍ॅनिमल प्रिंटच्या ड्रेसमध्ये दिसली होती. पण दिशाच्या चेह-यावरचे एक्सप्रेशन मात्र युजर्सला आवडले नव्हते. मग काय, याचवरून ती ट्रोल झाली होती. ‘अरे असे कसे शूट केले. जणू तुझ्याकडून कुणी बळजबरीने शूट करून घेतेय...,’ असे या युजरने लिहिले होते.  प्रत्येक फोटोत तू इतकी तणावात आणि घाबरलेली का दिसतेस? थोडे हसत जा,  असे या युजरने लिहिले होते. 

Web Title: disha patani shares a stunning picture from her beach vacation but trolled by netizens