देवाने चार बॉयफ्रेन्ड दिले तर...! या अभिनेत्रीला हवेत एक नव्हे चार बॉयफ्रेन्ड!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2020 14:36 IST2020-05-07T12:12:50+5:302020-05-07T14:36:11+5:30
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

देवाने चार बॉयफ्रेन्ड दिले तर...! या अभिनेत्रीला हवेत एक नव्हे चार बॉयफ्रेन्ड!!
बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी सध्या सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहे. टिकटॉकवरही तिची जाम चर्चा आहे. सध्या तिचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. ऐरवी बॉयफ्रेन्डबद्दल कधीही न बोलणारी दिशा या व्हिडीओत बॉयफ्रेन्डबद्दल बोलतेय.
‘खरं तर मला एकच बॉयफ्रेन्ड हवा. पण देवाने चार किंवा त्यापेक्षा अधिक दिलेच ती नकार देणारी कोण?’ असे दिशा या व्हिडीओत म्हणतेय. आता दिशाच्या एका बॉयफ्रेन्डचे नाव तर सगळ्यांचा ठाऊक आहे. पण एकासोबत चार बॉयफ्रेन्ड म्हटल्यावर, ते कोण? याचा अंदाज लावणे जरा कठीण आहे. त्यामुळे दिशाने हे कुठल्या संदर्भात म्हटले, हे तिलाच ठाऊक.
बॉलिवूडमध्ये दिशा व टायगर श्रॉफ यांच्या अफेअरच्या चर्चा अनेक दिवसांपासून आहेत. अद्याप दोघांनीही याची कबुली दिलेली नाही. पण दोघांचे एकत्र फिरणे, एकत्र डिनरला जाणे, एकत्रच सुट्टी एन्जॉय करणे हे सगळे बरेच काही सांगणारे आहे. दिशाचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. यात दिशा चांगलीच हॉट दिसतेय.
दिशाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर लॉकडाऊनपूर्वी ती ‘मलंग’ या सिनेमात दिसली होती. या सिनेमात तिच्यासोबत आदित्य रॉय कपूर मुख्य भूमिकेत होता. तर अनिल कपूर, कुणाल खेमू आणि अमृता खानविलकर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. तिचा हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर फार कमाल दाखवू शकला नव्हता. लवकरच दिशा सलमान खानच्या ‘राध’ सिनेमात दिसणार आहे. सध्या लॉकडाऊनमुळे या सिनेमाचे शूटिंग लांबणीवर पडले आहे. तूर्तास हा सिनेमा कधी रिलीज होणार याबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही.