"दिशाला सूटमध्ये पाहण्याची इच्छा इच्छाच राहिली" गंगा आरती करताना दिशाची फॅशन बघून चाहत्याची भन्नाट कमेंट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2023 16:01 IST2023-04-21T16:00:31+5:302023-04-21T16:01:41+5:30
बॉलिवूडमधील अतिशय फिट, हॉट अँड बोल्ड अभिनेत्री दिशा पटानी कायम तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असते.

"दिशाला सूटमध्ये पाहण्याची इच्छा इच्छाच राहिली" गंगा आरती करताना दिशाची फॅशन बघून चाहत्याची भन्नाट कमेंट
बॉलिवूड अभिनेत्री अनेकदा त्यांच्या कपड्यांवरुन ट्रोल होत असतात. कोणत्या इव्हेंटला कसे कपडे घालावे हे देखील त्यांना अनेकदा कळत नाही. काही अभिनेत्री स्वत:च तोकड्या कपड्यांमध्ये कंफर्टेंबल नसतात. तरी असे कपडे घालून त्यांना मिरवायचे असते. अशा वेळी नेटकरी त्यांना जबरदस्त ट्रोल करतात. आता हेच बघा अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani) पुन्हा एकदा तिच्या कपड्यांमुळे ट्रोल झाली आहे.
बॉलिवूडमधील अतिशय फिट, हॉट अँड बोल्ड अभिनेत्री दिशा पटानी कायम तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. पार्टी, लग्न किंवा अवॉर्ड सोहळा असो दिशा नेहमीच बोल्ड अंदाजात दिसते. दिशाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. यामध्ये ती वाराणसीमध्ये गंगा आरती करताना दिसत आहे. मात्र गंगा आरती करतानाही तिने काय कपडे घालावे हेही तिला कळालेलं नाही. दिशाने काळ्या रंगाचा क्रॉप टॉप आणि स्वेटपँट घातली आहे. यावर तिने शाल ओढलेली दिसते. तिच्या याच लुकवरुन ती ट्विटरवर प्रचंड ट्रोल होत आहे.
Disha Patani Doing Ganga Arti in Varanasi 🙏❤@DishPatani#DishaPatani#Varanasipic.twitter.com/i5N493Wh7B
— Disha Patani Fan Club ❤️ (@satyam20157) April 19, 2023
दिशाचा हा व्हिडिओ बघून नेटकरी संतप्त झाले आहेत. 'दिशाला सूटमध्ये पाहण्याची इच्छा इच्छाच राहिली' अशी कमेंट एकाने केली आहे. तर दुसरा म्हणतो, 'पू बनी पार्वती'.
दिशाला बरेचदा नेटकऱ्यांनी बिकीनी आणि इतर बोल्ड कपड्यातच पाहिलं आहे. तिने एखादेवेळी साडी जरी नेसली तरी ती साडी देखील फॅशनेबल आणि अंगप्रदर्शन करणारीच असते. आता गंगा आरती करताना तरी दिशाला फॅशन सेन्स नको का असा सवाल नेटकऱ्यांनी केलाय.