प्रेमासाठी कायपण! दिशा पाटनीच्या बॉयफ्रेंडने हातावर गोंदवला 'तो' खास टॅटू; Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2023 02:56 PM2023-08-20T14:56:34+5:302023-08-20T14:57:23+5:30

टायगर श्रॉफसोबत ब्रेकअप झाल्यानंतर दिशा तिच्या कथित बॉयफ्रेंडसह अनेकदा दिसली आहे.

disha patani s boyfriend alexander got disha s face tattoo on his hand video viral | प्रेमासाठी कायपण! दिशा पाटनीच्या बॉयफ्रेंडने हातावर गोंदवला 'तो' खास टॅटू; Video व्हायरल

प्रेमासाठी कायपण! दिशा पाटनीच्या बॉयफ्रेंडने हातावर गोंदवला 'तो' खास टॅटू; Video व्हायरल

googlenewsNext

बॉलिवूडची सुपरहॉट अभिनेत्री दिशा पाटनी (Disha Patani) सध्या तिच्या लव्हलाईफमुळे चर्चेत आहे. टायगर श्रॉफसोबत ब्रेकअप झाल्यानंतर दिशा तिच्या कथित बॉयफ्रेंडसह अनेकदा दिसली आहे. आता तर तिच्या रुमर्ड बॉयफ्रेंडने त्याच्या हातावर दिशाच्या चेहऱ्याचाच टॅटू बनवून घेतला आहे. सध्या याचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

दिशा सध्या ज्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे त्याचं नाव अलेक्झांडर (Alexander) आहे. नुकतंच अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. आश्चर्य म्हणजे यामध्ये दिशासोबत टायगर श्रॉफची बहीण कृष्णाही दिसत आहे. तिघेही कॅमेऱ्यासमोर पोज देत आहेत. नंतर अलेक्झांडरच्या हातावरील टॅटूवर फोकस केला आहे.

दिशाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. नेटकऱ्यांना नवीन विषय मिळाला आहे. 'आता टायगरचं काय होणार?'अशी कमेंट एकाने केली आहे.  'टॅटूमध्ये दिशा आदिवासी दिसतेय' असंही एकजण म्हणाला आहे. दिशा आणि टायगर अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. मात्र अचानक त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्या आल्या. नंतर दिशा अलेक्झांडरसोबत दिसायला लागली. टायगर आणि दिशा दोघंही अजूनही एकमेकांचे चांगले मित्र आहेत.  

2015 मध्ये 'लोफर' सिनेमातून दिशाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'एमएस धोनी द अनटोल्ड स्टोरी','बागी २','मलंग' सिनेमातही दिसली. आता दिशा दिग्दर्शिकाही झाली आहे. 'क्यो करुँ फिकर' या म्यूझिक व्हिडिओचे तिने दिग्दर्शन केले. आता ती आगामी 'कल्कि 2898 एडी' सिनेमात दिसणार आहे.

Web Title: disha patani s boyfriend alexander got disha s face tattoo on his hand video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.