सलमान खानच्या 'राधे'मध्ये जॅकी श्रॉफच्या छोट्या बहिणीच्या भूमिकेत दिसणार दिशा पटानी

By गीतांजली | Updated: January 6, 2021 15:23 IST2021-01-06T15:07:52+5:302021-01-06T15:23:26+5:30

रिलीज होण्याआधीच या सिनेमाने 230 कोटी कमावले आहेत.

Disha patani playing role of jackie shroff sister in film radhe | सलमान खानच्या 'राधे'मध्ये जॅकी श्रॉफच्या छोट्या बहिणीच्या भूमिकेत दिसणार दिशा पटानी

सलमान खानच्या 'राधे'मध्ये जॅकी श्रॉफच्या छोट्या बहिणीच्या भूमिकेत दिसणार दिशा पटानी

बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या ‘राधे’ सिनेमाची प्रतीक्षा इंडस्ट्रीसह प्रेक्षक आतुरतेने करत आहेत. या सिनेमात सलमानच्या अपोझिट दिशा पटानी दिसणार आहे. रिपोर्टनुसार दिशा या सिनेमात जॅकी श्रॉफच्या धाकट्या बहिणीची भूमिका साकारताना दिसणार आहे.

सलमान, दिशा आणि जॅकी यांनी ‘भारत’ सिनेमात काम केले. त्यानंतर आता हे तिघेही 'राधे'मध्ये एकत्र काम करत आहेत. मात्र, 'भारत' सिनेमात तिघांचा एकाही एकत्र सीन नव्हता. 'राधे'मध्ये मात्र तसे होणार नाही. 'राधे' सिनेमात  दिशा जॅकीच्या छोट्या बहिणीची भूमिका साकारणार आहे. 

बॉलिवूड हंगामाने दिलेल्या वृत्तानुसार, सलमानच्या ‘राधे- योर मोस्ट वॉन्टेड भाई’चे सॅटेलाईट, थिएटर रिलीज, डिजिटल रिलीज व म्युझिक राईट्स झी स्टुडिओला विकण्यात आले आहेत. ही डिल कितीची तर तब्बल 230 कोटींची. म्हणजेच काय तर रिलीज होण्याआधीच या सिनेमाने 230 कोटी कमावले आहेत. या डिलची बातमी खरी मानाल तर कोरोना काळातील बॉलिवूडची ही सर्वात मोठी डिल आहे. प्रभुदेवाने हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे.खरे तर या मावळत्या वर्षात ईदच्या मुहूर्ताला हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र कोरोनामुळे सगळे वेळापत्रकच विस्कटले.

Web Title: Disha patani playing role of jackie shroff sister in film radhe