दिशा पाटनीचा रुमर्ड रोमियो कधीच दाखवत नाही चेहरा, तिच्यापेक्षा ६ वर्षांनी आहे लहान!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 16:31 IST2026-01-14T16:30:16+5:302026-01-14T16:31:43+5:30
दिशाचा हा रुमर्ड बॉयफ्रेंड त्यांच्या फेस मास्कमुळेही चर्चेत असतो. ते कधीही आपला चेहरा उघड करत नाहीत.

दिशा पाटनीचा रुमर्ड रोमियो कधीच दाखवत नाही चेहरा, तिच्यापेक्षा ६ वर्षांनी आहे लहान!
बॉलिवूडमधील सर्वात फिट आणि ग्लॅमरस अभिनेत्रींमध्ये दिशा पाटानीचे नाव नेहमीच आघाडीवर असते. तिच्या टोन्ड फिगरमुळे ती लाखो लोकांसाठी फिटनेस आयकॉन बनली आहे. सध्या दिशा सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. निमित्त ठरला आहे एक लोकप्रिय गायक. दिशा ही पंजाबी गायक तलविंदरला डेट करत असल्याची चर्चा आहे. तिचा दिशाचा हा रुमर्ड बॉयफ्रेंड त्यांच्या फेस मास्कमुळेही चर्चेत असतो. ते कधीही आपला चेहरा उघड करत नाहीत. सोशल मीडिया असो किंवा परफॉर्मन्स, तलविंदर आपला चेहरा पेंट किंवा मास्कच्या साहाय्याने लपवून ठेवतो.
दिशापेक्षा तलविंदर हा सहा वर्षांनी लहान आहे. त्याचा जन्म २३ नोव्हेंबर १९९७ रोजी अमृतसरमध्ये झाला. इन्स्टाग्रामवर त्याचे ६.७ दशलक्ष फॉलोअर्स असूनही त्याच्या एकाही फोटोत त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नाही. तो केवळ गायकच नाही तर गीतकार आणि संगीत निर्माताही आहे. त्याने हनी सिंगसोबतही काम केलं आहे. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये वाढल्यामुळे त्याच्या संगीतावर पाश्चात्य संगीताचा मोठा प्रभाव आहे. तो प्रामुख्याने ट्रॅप, लो-फाय , हिप-हॉप आणि आर अँड बी यांसारख्या आधुनिक संगीत प्रकारांसाठी ओळखला जातो.
दिशा पाटनीनं कुणा-कुणाला डेट केलंय?
दिशा पाटनीच्या लव्ह लाईफबाबत नेहमीच चर्चा होत असते. आतापर्यंत तिचं नाव काही सेलिब्रिटींसोबत जोडलं गेलं आहे. दिशा पाटनीचं नाव सर्वाधिक टायगर श्रॉफसोबत जोडलं गेलं. पण, काही वर्ष डेट केल्यानंतर त्यांचं ब्रेकअप झालं. दिशाचं नाव टीव्ही अभिनेता पार्थ समथानसोबतही जोडलं गेलं होतं. दोघे काही काळ एकमेकांसोबत स्पॉट झाले होते. मात्र हे नातं फार काळ टिकू शकलं नाही. तसेच नाव तिचा जुना मित्र अलेक्झांडर अलेक्स इलिचसोबत जोडलं गेलं. दोघे अनेकदा पार्टी आणि कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसले. मात्र या नात्याबाबतही दिशानं स्पष्ट काहीच सांगितलेलं नाही. ते आताही अनेकदा एकत्र दिसून येतात. सर्वात विशेष म्हणजे दिशाचं नाव शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि उद्धव ठाकरेंचा पुत्र असलेल्या आदित्य ठाकरेंशीदेखील जोडलं गेलं आहे.