OMG : ऋतिकच्या फ्लर्टला कंटाळून दिशाने सोडला सिनेमा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2018 11:18 IST2018-08-27T10:57:21+5:302018-08-27T11:18:50+5:30

'बागी 2'च्या यशानंतर दिशा पटानीचे नाव आघाडीच्या अभिनेत्रींच्या लिस्टमध्ये सामील झाले आहे. तिने नुकतीच सलमान खान स्टारर भारत साईन केला आहे.

Disha leave the film because of hrithik flirting | OMG : ऋतिकच्या फ्लर्टला कंटाळून दिशाने सोडला सिनेमा?

OMG : ऋतिकच्या फ्लर्टला कंटाळून दिशाने सोडला सिनेमा?

ठळक मुद्दे दिशाने टायगरमुळे नाही तर ऋतिकमुळे सोडल्याचे कळतेय टायगरदेखील ऋतिकवर नाराज झाला आहे

'बागी 2'च्या यशानंतर दिशा पटानीचे नाव आघाडीच्या अभिनेत्रींच्या लिस्टमध्ये सामील झाले आहे. तिने नुकतीच सलमान खान स्टारर भारत साईन केला आहे. तसेच ती टायगर श्रॉफ आणि ऋतिक रोशन यांच्या सिनेमात दिसणार होती. मात्र आता दिशाने हा सिनेमा सोडून दिल्याची माहिती मिळतेय. हा सिनेमा दिशाने टायगरमुळे नाही तर ऋतिकमुळे सोडल्याचे कळतेय. 


नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार, दिशाने सिनेमा सोडण्याचे कारण ऋतिक रोशन आहे. ऋतिकने दिशासोबत फ्लर्ट करण्याचा प्रयत्न केला. त्याने दिशाच्या एका जवळच्या मित्राला मेसेज करुन तिला डेटवर येण्याबाबत विचारले. ही गोष्ट तिला अजिबात आवडली नाही आणि याच कारणामुळे नाराज झालेल्या दिशाने सिनेमा सोडून दिला. दिशासोबतच्या फ्लर्टच्या प्रकरणाला घेऊन टायगरदेखील ऋतिकवर नाराज झाल्याचे कळतेय ऐवढेच नाही तर त्यांने ऋतिकशी बोलणं सुद्धा बंद केले आहे. ही पहिली वेळ नाही जेव्हा ऋतिकवर एखाद्या अभिनेत्रीने असा आरोप लावला आहे. याआधी कंगना राणौतसोबत झालेल्या वादामुळे देखील तो चांगला चर्चेत राहिला होता.  


ऋतिक आणि टायगरच्या सिनेमाबाबत बोलायचे झाले तर यात भरपूर अॅक्शन सीन्स बघायला मिळणार आहेत. अॅक्शन सीन्स जबरदस्त बनवण्यासाठी इंटरनॅशनल स्टंट कॉरियोग्राफरला बोलवण्यात आले आहे.  सिनेमाचे शूटिंग भारतासह इटली, जॉर्जिया, पुर्तगाल, आबु-धाबी आणि स्विडनमध्ये होणार आहे. सिनेमा 2020च्या फेब्रुवारी महिन्यांपर्यंत रोजी रिलीज होण्याची शक्यता आहे.


दिशा सलमान सोबत 'भारत' सिनेमात दिसणार आहे. यात ती सलमानच्या बहिणीची भूमिका साकारणार आहे. सलमानच्या अपोझिट यात कॅटरिना कैफ दिसणार आहे. 

Web Title: Disha leave the film because of hrithik flirting