ब्रेकअपचे दुःख सहन न झाल्याने या अभिनेत्रीने सोडले बॉलिवूड, ओळखणे देखील होतंय कठीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 18:37 IST2021-02-08T18:35:53+5:302021-02-08T18:37:30+5:30

या अभिनेत्रीचे अफेअर डॅनी डेन्झोपासोबत होते. ते दोघे अनेक वर्षं लीव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात होते.

‘Disco Dancer’ actress Kim Yashpal left bollywood due to breakup | ब्रेकअपचे दुःख सहन न झाल्याने या अभिनेत्रीने सोडले बॉलिवूड, ओळखणे देखील होतंय कठीण

ब्रेकअपचे दुःख सहन न झाल्याने या अभिनेत्रीने सोडले बॉलिवूड, ओळखणे देखील होतंय कठीण

ठळक मुद्देडिस्को डान्सर हा मिथुन चक्रवर्ती यांच्या कारकिर्दीतील हिट चित्रपटांपैकी एक चित्रपट आहे. या चित्रपटात किम महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. याशिवाय तिने नसीब, फिर वही रात यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.

जिमी जिमी आजा आजा हे गाणे तुम्हाला आठवतेय का हे गाणे किम यशपाल अस्सीवर चित्रीत झाले होते. किमने तिच्या कारकिर्दीत अनेक प्रसिद्ध कलाकारांसोबत काम केले. पण ती अचानक बॉलिवूडपासून दूर झाली. पण अनेक वर्षांनंतर किम चर्चेत आली आहे. तिचा २०१६ मधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या फोटोत तिला ओळखणे देखील कठीण जात आहे. 

डिस्को डान्सर हा मिथुन चक्रवर्ती यांच्या कारकिर्दीतील हिट चित्रपटांपैकी एक चित्रपट आहे. या चित्रपटात किम महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. याशिवाय तिने नसीब, फिर वही रात यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. किमने राजेश खन्ना, शत्रुघ्न सिन्हा यांसारख्या अनेक प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत काम केले आहे. 

Posted by Kim Yashpal on Sunday, January 19, 2014

किम प्रसिद्धीझोतात असल्याने अचानक गायब झाल्याने तिच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला होता. किमने अनेक चित्रपटांमध्ये डॅनी डेन्झोपासोबत काम केले होते. चित्रपटांमध्ये काम करत असताना डॅनी आणि ती एकमेकांच्या प्रेमात पडले. ते दोघे सात वर्षं लीव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात होते. पण १९८० मध्ये अचानक त्यांचे ब्रेकअप झाले. पण ब्रेकअपचा किमला इतका मोठा मानसिक धक्का बसला की, किमने चित्रपटसृष्टी सोडली.

Posted by Kim Yashpal on Saturday, October 15, 2016

किम कुठे आहे याबाबत अनेक वर्षं कोणालाच माहीत नव्हते. किमचे निधन झाले असल्याच्या बातम्या देखील काही वर्षांपूर्वी मीडियात आल्या होत्या. पण तिचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून हा फोटो २०१६ मधील आहे. किम सध्या मुंबईत राहात असल्याचे म्हटले जाते.  

 

Web Title: ‘Disco Dancer’ actress Kim Yashpal left bollywood due to breakup