'रॉकस्टार' सिनेमाचा सीक्वल येणार? दिग्दर्शक इम्तियाज अलीने दिली मोठी हिंट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 11:26 AM2024-05-17T11:26:08+5:302024-05-17T11:27:13+5:30

'रॉकस्टार' हा सिनेमा 2011 मध्ये रिलीज झाला होता.

Director Imtiaz Ali gave a big hint there Will be a sequel of Rockstar | 'रॉकस्टार' सिनेमाचा सीक्वल येणार? दिग्दर्शक इम्तियाज अलीने दिली मोठी हिंट

'रॉकस्टार' सिनेमाचा सीक्वल येणार? दिग्दर्शक इम्तियाज अलीने दिली मोठी हिंट

एखादा चित्रपट हिट झाला की प्रेक्षकांना तो पुन:पुन्हा पाहायचा असतो. याचा फायदा घेत सिनेनिर्माते लगेचच त्याचे सिक्वेल तयार करण्याच्या तयारीला लागतात.  बॉलिवूडलाही सिक्वेलची हीच चटक लागली आहे. बॉलिवूडचा पडदादेखील सिक्वेलपटांनी भरला आहे. आता यातच 'रॉकस्टार' या सुपरहीट सिनेमाचा सिक्वेल येणार असल्याचं बोललं जात आहे. यावर दिग्दर्शक इम्तियाज अलीने मोठी हिंट दिली आहे. 

'रॉकस्टार' हा सिनेमा 2011 मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री नर्गिस फाखरी मुख्य भूमिकेत होते. इम्तियाज अली दिग्दर्शित या चित्रपटाला खूप दाद मिळाली. आता इम्तियाजनेही या सिनेमाचा सिक्वेल करण्याचे संकेत दिले आहेत.  अलीकडेच संगीतकार ए आर रहमान, गीतकार इर्शाद कामिल आणि गायक मोहित चौहान यांच्या इम्तियाजसोबतच्या संभाषणाचा व्हिडीओ नेटफ्लिक्स या डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे जारी करण्यात आला आहे. यामध्ये चौघांनी एकत्र केलेल्या त्यांच्या चित्रपट आणि गाण्यांबद्दल चर्चा केल्याचं दिसून येत आहे.

व्हिडीओमध्ये दिसते की, एआर रहमान इम्तियाजला विचारतो की आपण 'रॉकस्टार 2' बनवत आहोत का? यावर इम्तियाज म्हणतो, 'याबद्दल सांगण्यासाठी आपल्याकडे 'संगीतदृष्ट्या' काहीतरी हवे'. यावर एआर रहमान इम्तियाजला  क्राउडसोर्स स्टोरी करण्यास सुचवतो. तो म्हणतो, 'आपण ते जनतेवर सोडले पाहिजे. चला हा चित्रपट क्राउडसोर्स करूया. तुम्हाला भविष्य कधीच कळत नाही. म्हणजे, तुम्ही क्राउडसोर्सद्वारे लाखो कथा शोधू शकता'. यावर इम्तियाज  'रॉकस्टार 2' ची आशा व्यक्त करतो. या संवादातून हे स्पष्ट होते की ही टीम 'रॉकस्टार 2' साठी उत्साहित आहे.
 

Web Title: Director Imtiaz Ali gave a big hint there Will be a sequel of Rockstar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.