डिनोचे नंदितासोबतही ब्रेकअप??
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2016 19:30 IST2016-09-11T14:00:38+5:302016-09-11T19:30:38+5:30
बॉलिवूडमध्ये सध्या जणू ब्रेकअपचेच सीझन सुरु आहे. रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ यांच्या ब्रेकअपनंतर अनेकांच्या ब्रेकअपच्या बातम्या आल्या. आता ...

डिनोचे नंदितासोबतही ब्रेकअप??
ब लिवूडमध्ये सध्या जणू ब्रेकअपचेच सीझन सुरु आहे. रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ यांच्या ब्रेकअपनंतर अनेकांच्या ब्रेकअपच्या बातम्या आल्या. आता ताजी बातमी आहे ती डिनो मोरिया व नंदिता महतानी यांच्या ब्रेकअपची. नंदिता महतानी एक सुप्रसिद्ध फॅशन डिझाईनर आहे. सोबतच करिश्मा कपूरचा पूर्वाश्रमीचा पती संजय कपूरची एक्स वाईफ अशीही नंदिताची ओळख आहे. नंदिता व डिनो यांच्यातील ब्रेकअपचे कारण तर माहित नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,डिनो आणि नंदिता दोघांच्याही कुटुंबांचा या नात्याला विरोध नव्हताच. उलट दोघांनीही लग्न करावे, असे दोन्ही कुटुंबाचे मत होते. डिनो यासाठी तयारही होता. पण नंदिताने लग्नाचा निर्णय टांगणीवर ठेवला होता. कदाचित दोघेही वेगळे होण्यामागे हे एक कारण असावे. बिपाशा बसूसोबत ब्रेकअप झाल्यानंतर डिनोच्या आयुष्यात नंदिता आली होती. मात्र तिच्यासोबतही डिनोचे ब्रेकअप झाले. असो, दोघांमधील मतभेद लवकर निवळावेत, इतकीच सदिच्छा...