लेक ट्विंकलसोबत फोटो काढण्यास डिंपल कपाडियांचा नकार, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले- "जया बच्चन..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2024 08:59 IST2024-10-24T08:59:13+5:302024-10-24T08:59:38+5:30

डिंपल कपाडिया, ट्विंकल खन्ना आणि अक्षय कुमार यांनी मुंबईत एका इव्हेंटला हजेरी लावली होती. या इव्हेंटमधील डिंपल कपाडिया यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. 

Dimple Kapadia refused to click photo with twinkle khanna said i dont pose with juniors | लेक ट्विंकलसोबत फोटो काढण्यास डिंपल कपाडियांचा नकार, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले- "जया बच्चन..."

लेक ट्विंकलसोबत फोटो काढण्यास डिंपल कपाडियांचा नकार, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले- "जया बच्चन..."

डिंपल कपाडिया या सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री आहेत. अभिनय आणि सौंदर्याने त्यांनी एक काळ गाजवला. सध्या त्या गो नानी गो या त्यांच्या सिनेमामुळे चर्चेत आहेत. नुकतंच डिंपल कपाडिया, ट्विंकल खन्ना आणि अक्षय कुमार यांनी मुंबईत एका इव्हेंटला हजेरी लावली होती. या इव्हेंटमधील डिंपल कपाडिया यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. 

या व्हिडिओमध्ये डिंपल कपाडिया पापाराझींना फोटोसाठी पोझ देताना दिसत आहेत. तेवढ्यात पाठीमागून ट्विंकल खन्ना येत असल्याचं दिसत आहे. ट्विंकलला पाहून पापाराझी डिंपल यांना लेकीबरोबर फोटोसाठी पोझ देण्यास सांगत असल्याचं दिसत आहे. पण, डिंपल यांनी ट्विंकलसोबत फोटो काढण्यास स्पष्ट नकार दिला आहे. ट्विंकलसोबत फोटो काढण्यास सांगितल्यावर डिंपल कपाडिया म्हणाल्या की "मी ज्युनियर्ससोबत पोझ देत नाही". डिंपल कपाडिया यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. विरल भय्यानीच्या इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आलेला हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 


डिंपल कपाडियांनी लेकीसोबत फोटो काढण्यास नकार दिल्याने आणि तिला ज्युनियर म्हटल्याने नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केलं आहे. अनेकांनी त्यांची तुलना जया बच्चन यांच्याबरोबर केली आहे. "जया बच्चन पार्ट २", "इथे पण ज्युनियर्स सिनियर असतं का?", "सिनियर सिटिझनचा आदर करा", "जया बच्चन २.०" अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. 

Web Title: Dimple Kapadia refused to click photo with twinkle khanna said i dont pose with juniors