जन्मदात्यांशीच तोडलं नातं, वयाच्या ११ व्या वर्षी आई वडिलांपासून दूर झाला दिलजीत दोसांझ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2024 11:23 AM2024-04-05T11:23:03+5:302024-04-05T11:23:37+5:30

दिलजीत दोसांझचं बालपण कसं होतं माहितीये का?

Diljit Dosanjh s childhood broke relationship with his parents since age of 11 | जन्मदात्यांशीच तोडलं नातं, वयाच्या ११ व्या वर्षी आई वडिलांपासून दूर झाला दिलजीत दोसांझ

जन्मदात्यांशीच तोडलं नातं, वयाच्या ११ व्या वर्षी आई वडिलांपासून दूर झाला दिलजीत दोसांझ

पंजाबी गायक दिलजीत दोसांझ (Diljit Dosanjh) अल्पावधीतच लोकप्रिय झाला आहे. त्याचं गाणं तर रसिकांना आवडतंच पण त्याचा भोळा स्वभाव चाहत्यांचं मन जिंकून घेतो. हॉलिवूड स्टार कायली जेनरचा तो चाहता आहे हे जेव्हा लोकांना कळलं तेव्हापासूनच तो सोशल मीडियावर खूपच चर्चेत आला होता. तर नुकतंच अंबानींच्या पार्टीत रिहानानापेक्षा त्याचाच परफॉर्मन्स जास्त एन्जॉय केला गेला. अशा या अवलियाने त्याच्या खाजगी जीवनाबद्दल नुकताच एक खुलासा केला.

रणवीर अलाहाबादियाच्या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, "मी ११ वर्षांचा होतो जेव्हा मी घरातून बाहेर पडलो आणि मामाकडे राहायला लागलो.गाव सोडून लुधियाना शहरात आलो होतो. माझ्या मामाने आई वडिलांना सांगितलं की याला माझ्यासोबत शहरात पाठवा आणि आईवडिलही म्हणाले हा घेऊन जा. त्यांनी मला जायचंय की नाही याविषयी एकदाही विचारलं देखील नाही."

तो पुढे म्हणाला, "मी एका छोट्या खोलीत एकटा असायचो. फक्त शाळेत जायचो आणि परत यायचो. तिथे टीव्हीही नव्हता. माझ्याकडे वेळच वेळ होता. तेव्हा तर मोबाईलही नव्हते. मला आईवडिलांना फोन करायचा झाल्यास किंवा त्यांचा येणार असेल तरी पैसे लागायचे. यामुळे मी त्यांच्यापासून दूरावलो. अर्थात माझ्या चांगल्या भविष्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला होता. पण आता फक्त त्यांच्याशीच नाही तर माझं सगळ्यांशीच नातं तुटलं आहे."

"मी आईचा खूप आदर करतो. माझे वडील तर खूप प्रेमळ आहेत. त्यांनी मला कधीच विचारलं नाही की मी कुठल्या शाळेत जातो, कुठे असतो, काय करतो. माझं आता त्या सर्वांशीच नातं राहिलेलं नाही."

दिलजीतचा 'चमकीला' सिनेमा रिलीज होणार आहे. पंजाबी गायक अमर सिंह चमकीला यांच्या जीवनावर सिनेमा आधारित आहे. दिलजीतने यामध्ये त्यांचीच भूमिका साकारली आहे. तर परिणीती चोप्रानेही काम केलं आहे.

Web Title: Diljit Dosanjh s childhood broke relationship with his parents since age of 11

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.