12 दिवसांत दिलीप कुमार यांच्या घरात दुसरा मृत्यू, कोरोनामुळे आणखी एका भावाचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2020 09:57 AM2020-09-03T09:57:41+5:302020-09-03T10:00:19+5:30

एहसान खान यांनी बुधवारी 2 सप्टेंबर रोजी रात्री 11 वाजता अखेरचा श्वास घेतला

Dilip Kumar’s brother Ehsan Khan dies of Covid-related complications | 12 दिवसांत दिलीप कुमार यांच्या घरात दुसरा मृत्यू, कोरोनामुळे आणखी एका भावाचे निधन

12 दिवसांत दिलीप कुमार यांच्या घरात दुसरा मृत्यू, कोरोनामुळे आणखी एका भावाचे निधन

googlenewsNext
ठळक मुद्देदरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिलीप कुमार गेल्या पाच महिन्यांत एकदाही घराबाहेर पडलेले नाही. त्यांच्या पत्नी सायरा बानो यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप कुमार यांची प्रकृती ठणठणीत आहे.  

कोरोनाने जगभर थैमान घातले आहे़ भारतातही कोरोनाचा कहर वाढत आहे. बॉलिवूडमधील सेलिब्रिटीही याला अपवाद नाही. आता बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचे धाकटे बंधू एहसान खान यांचे कोरोनामुळे निधन झाले. ते 90 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते कोरोनाला झुंज देत होते. त्यांच्यावर हृदयरोग, हायपर टेन्शन आणि अल्झायमर यांसारख्या आजारावर देखील उपचार सरू होते.  
एहसान खान यांनी मुंबईतील लीलावती रुग्णालयामध्ये बुधवारी 2 सप्टेंबर रोजी रात्री 11 वाजता अखेरचा श्वास घेतला.  

काही दिवसांपूर्वी दिलीप कुमार यांचा धाकटा भाऊ असलम खान यांचा मृत्यू झाला होता.  ते  सुद्धा कोरोना पॉझिटीव्ह आढळले होते. 21 ऑगस्ट रोजी असलम खान यांनी अखेरचा श्वास घेतला होता.
असलम खान यांच्या पाठोपाठ काल एहसान खान यांचीही प्राणज्योत मालवली. अभिनेता दिलीप कुमार यांच्या कुटुंबीयांना बसलेला हा दुसरा मोठा धक्का आहे. गेल्या 12 दिवसात दिलीप कुमार यांच्या घरातील हा दुसरा मृ्त्यू आहे.

असलम आणि एहसान दोघांनाही श्वसनाचा त्रास होत होता. दोघांनाही व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. एहसान आणि असलम यांना 15 ऑगस्ट रोजी कोरोना व्हायरस संक्रमणामुळे मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दोन्ही भावांवर मुंबईतील प्रसिद्ध डॉक्टर जलील पारकर करत होते.
दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिलीप कुमार गेल्या पाच महिन्यांत एकदाही घराबाहेर पडलेले नाही. त्यांच्या पत्नी सायरा बानो यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप कुमार यांची प्रकृती ठणठणीत आहे.  

Web Title: Dilip Kumar’s brother Ehsan Khan dies of Covid-related complications

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.