खासदार नुसरत जहाँ यांच्या ख्रिश्चन वेडिंगचे फोटो तुम्ही पाहिले का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 18:16 IST2019-06-23T18:15:06+5:302019-06-23T18:16:40+5:30

बंगाली सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि पश्चिम बंगाल येथील बशीरघाटकडून तृणमूल काँग्रेसची खासदार नुसरत जहां विवाहबंधनात अडकली आहे. आता तिने ख्रिश्चन पद्धतीने देखील लग्न केले आहे. तिचे या वेडिंगचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे दिसून येत आहे. 

Did you see photos of Christian Wedding of Nusrat Jha? | खासदार नुसरत जहाँ यांच्या ख्रिश्चन वेडिंगचे फोटो तुम्ही पाहिले का?

खासदार नुसरत जहाँ यांच्या ख्रिश्चन वेडिंगचे फोटो तुम्ही पाहिले का?

बंगाली सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि पश्चिम बंगाल येथील बशीरघाटकडून तृणमूल काँग्रेसची खासदार नुसरत जहां विवाहबंधनात अडकली आहे. अलिकडेच तिने हिंदू पद्धतीने लग्न केले. आता तिने ख्रिश्चन पद्धतीने देखील लग्न केले आहे. तिचे या वेडिंगचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे दिसून येत आहे. 

तृणमूल काँग्रेसच्या या खासदारने संसदेत जाऊन शपथ घेतली नाही. ती तिच्या हळदीमध्ये व्यग्र होती. नुसरतने तिच्या हळदीचा फोटो तिच्या इन्स्टग्रामवर शेअर केला होता ज्यात ती तिच्या वडीलांसोबत दिसली.  नुसरतने काही दिवसांपूर्वीच निवडणूक जिंकल्यानंतर तिच्या रिलेशनशिपबद्दल तिच्या इन्स्टाग्रामवर माहिती दिली होती. ती कोलकाताचा प्रिसिद्ध व्यावसायिक निखिल जैनसोबत लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचा खुलासा तिनं तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये केला होता.   

नुसरतनं काही दिवसांपूर्वीच निवडणूक जिंकल्यानंतर तिच्या रिलेशनशिपबद्दल तिच्या इन्स्टाग्रामवर माहिती दिली होती. ती कोलकाताचा प्रिसिद्ध व्यावसायिक निखिल जैनसोबत लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचा खुलासा तिनं तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये केला होता. नुसरत आणि निखिल यांची पहिली भेट २०१८ मध्ये दुर्गा पूजेदरम्यान झाली होती.  नुसरतने आपल्या राजेशाही लग्नासाठी तुर्की हे डेस्टिनेशन निवडलं होतं. १९ जून ते २१ जूनपर्यंत हे डेस्टिनेशन वेडिंग तुर्कीत पार पडलं. 

हिंदू रीतिरिवाजानुसार लग्न केल्यानंतर निखिल आणि नुसरतने ख्रिश्चन पद्धतीनंही लग्न केले. त्यांच्या या ख्रिश्चन वेडिंगचे फोटो नुसरतने तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. नुसरतने शेअर केलेल्या या ख्रिश्चन वेडिंगच्या फोटोमध्ये ती व्हाइट गाऊनमध्ये खूप सुंदर दिसत आहे. तर निखिलच्या चेहऱ्यावरही आनंद स्पष्ट दिसत आहे. नुसरत निखिलने त्यांच्या ख्रिश्चन वेडिंगनंतर एक बीच पार्टीही ठेवली होती. ज्यात त्यांचे जवळचे नातेवाईक आणि मित्र सहभागी झाले होते.  

Web Title: Did you see photos of Christian Wedding of Nusrat Jha?