'शोले' फेम गब्बरच्या मुलीला पाहिलंत का?, तीदेखील अभिनेत्री असून दिसते खूप सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2021 07:00 IST2021-05-26T07:00:00+5:302021-05-26T07:00:00+5:30

अमजद खान यांच्या कुटुंबाविषयी फार कमी लोकांना माहित आहे.

Did you see the daughter of 'Sholay' fame Gabbar? She is also an actress and looks very beautiful | 'शोले' फेम गब्बरच्या मुलीला पाहिलंत का?, तीदेखील अभिनेत्री असून दिसते खूप सुंदर

'शोले' फेम गब्बरच्या मुलीला पाहिलंत का?, तीदेखील अभिनेत्री असून दिसते खूप सुंदर

आजही बॉलिवूड सिनेमांचा उल्लेख केला गेला तर शोले या सिनेमाचा उल्लेख होतोच. आणि शोलेचा उल्लेख झाला तर गब्बर सिंगच्या उल्लेख होणार नाही असे होऊ शकत नाही. या सिनेमातील 'सो जा बेटा नहीं तो गब्‍बर आ जाएगा' हा डायलॉग आजही तितकाच लोकप्रिय आहे जितका त्यावेळी झाला होता. इतकी गब्बर सिंगची भूमिका प्रभाव करून गेली आहे. ही भूमिका साकारणारे अभिनेते अमजद खान हे तर या भूमिकेमुळे अजरामर झाले आहेत. याचं गब्बरची मुलगी खूप सुंदर आहे. अमजद खान यांच्या मुलीचे नाव अहलम खान असे आहे. 

बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय 'शोले' या चित्रपटात गब्बर ही खलनायकाची भूमिका साकारल्यानंतर अमजद खान खूपच हिट झाले. अमजद खान यांच्या कुटुंबाविषयी फार कमी लोकांना माहित आहे. त्यांना दोन मुलं आणि एक मुलगी आहे. त्यांचा मुलीचे नाव अहलम खान आहे.

अहलम एक थिएटर आर्टिस्ट असून, ती काही वर्षापूर्वी विवाह बंधनात अडकली.

अहलम खान हीदेखील अभिनेत्री असून ती दिसायला खूप सुंदर आहे. तिने चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. आता ती रंगमंचाच्या माध्यमातून आपली आवड जपते आहे.   


अहलमने थिएटर आर्टिस्ट आणि हिप हिप हुर्रे फेम जफर करांचीवालासोबत लग्न केले आहे. एक कलाकार असून देखील अहलमने सोशल मीडिया अकाउंट प्रायव्हेट ठेवले आहे.
 

Web Title: Did you see the daughter of 'Sholay' fame Gabbar? She is also an actress and looks very beautiful