फोटोत फ्रॉकमध्ये दिसणाऱ्या या चिमुरडीला ओळखलंत का?, आता ती आहे बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि दिग्दर्शिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2022 07:00 IST2022-03-06T07:00:00+5:302022-03-06T07:00:00+5:30

बॉलिवूडच्या या अभिनेत्रीने ४ वर्षांची असताना पहिल्यांदा जाहिरातीत चाइल्ड मॉडेल म्हणून काम केले होते.

Did you recognize this girl who appears in a frock in the photo ?, now she is a famous Bollywood actress and director | फोटोत फ्रॉकमध्ये दिसणाऱ्या या चिमुरडीला ओळखलंत का?, आता ती आहे बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि दिग्दर्शिका

फोटोत फ्रॉकमध्ये दिसणाऱ्या या चिमुरडीला ओळखलंत का?, आता ती आहे बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि दिग्दर्शिका

हल्ली कलाकार सोशल मीडियावर आपल्या बालपणीचे फोटो शेअर करताना दिसतात आणि त्यांच्या अविस्मरणीय आठवणींना उजाळा देताना दिसतात. बऱ्याचदा त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. आता बॉलिवूडची अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि निर्माती पूजा भट (Pooja Bhatt) हिने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर तिच्या बालपणीचा फोटो शेअर केला आहे. पण तिचा हा फोटो पहिल्यांदा जेव्हा तिने जाहिरातीत काम केले तेव्हाचा आहे.

पूजा भट हिने इंस्टाग्रामवर तिच्या बालपणीचा फोटो शेअर करत लिहिले की, माझी पहिली जाहिरात पाँड्स टॅल्कम पावडरची. त्यावेळी मी ४ वर्षांची होती. पूजा भटच्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे. तिच्या या फोटोवर चाहतेच नाही तर सेलिब्रेटीही कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. 

पूजा भट्ट चित्रपटांपेक्षा तिच्या खासगी आयुष्यामुळे जास्त चर्चेत राहिली. पूजा भटने एकेकाळी बॉलिवूडवर राज्य केले होते. पूजा भट्टने तिच्या करिअरची सुरूवात १९८९ मध्ये 'डॅडी' चित्रपटातून केली होती. याचे दिग्दर्शन तिचे वडील महेश भट्ट यांनी केले होते. पूजा केवळ १७ वर्षांची असताना अभिनेत्री झाली होती. तिच्या कामाचे खूप कौतुक झाले होते. यानंतर तिने दिल है के मानता नही, सडक, जुनून, बॉर्डर, जख्म यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याचसोबत तिने अनेक चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन देखील केले आहे.

Web Title: Did you recognize this girl who appears in a frock in the photo ?, now she is a famous Bollywood actress and director