कोण आहे फरहान अख्तरची पहिली पत्नी अधुना भबानी? काय आहे तिचं बॉलिवूड कनेक्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2022 17:11 IST2022-02-18T13:31:28+5:302022-02-19T17:11:23+5:30
फरहानच्या पहिल्या पत्नीचं नाव अधुना भबानी (Adhuna Bhabani) आहे.

कोण आहे फरहान अख्तरची पहिली पत्नी अधुना भबानी? काय आहे तिचं बॉलिवूड कनेक्शन
फरहान अख्तर ( Farhan Akhtar ) आणि शिबानी दांडेकर ( Shibani Dandekar) अखेर लग्नबंधनात अडकणार आहेत. उद्या 19 तारखेला हिंदू पद्धतीने दोघंही विवाहबंधनात अडकणार असल्याची माहिती आहे.लग्नापूर्वी हळदी समारंभाने विवाहसोहळ्याला सुरुवात झाली आहे. आज कलाविश्वातील बहुचर्चित कपल म्हणून या जोडीकडे पाहिलं जातं. शिबानीचं हे पहिलं लग्न असले तरी फरहानचं हे दुसरं लग्न आहे. त्यामुळे अनेकांना फरहान अख्तरच्या पहिल्या पत्नीविषयी जाणून घेण्याची उत्सुकता आहे. फरहानच्या पहिल्या पत्नीचं नाव अधुना भबानी (Adhuna Bhabani) आहे.
शिबानीला डेट करण्यापूर्वी फरहानने अधुना भबानीसोबत (Adhuna Bhabani) संसार थाटला होता. मात्र, २०१७ मध्ये या दोघांनी १९ वर्षांचा संसार मोडला आणि ते विभक्त झाले.
कोण आहे अधुना ?
अधुना ही कलाविश्वातील लोकप्रिय सेलिब्रिटी हेअर स्टायलिस्ट असून बी ब्लंट या सॅलॉनची ओनर आहे. फरहान आणि अधुनाचं लव्हमॅरेज होतं. या अधुनाही फरहानपेक्षा ६ वर्षांनी मोठी असल्याचं सांगण्यात येत. १९९७ मध्ये एका नाईट क्लबमध्ये या दोघांची पहिली भेट झाली होती. या भेटीचं रुपांतर प्रेमात झालं आणि त्यांनी 2000 मध्ये लग्नगाठ बांधली.
फरहानचं अधुनावर प्रचंड प्रेम होतं. त्यामुळे तिच्या ४० व्या वाढदिवशी त्याने हिऱ्याची अंगठी तिला गिफ्ट केली होती. परंतु, लग्नाच्या काही वर्षांनंतर या दोघांच्या नात्यात दुरावा आला.
२०१७ मध्ये या दोघांनी वांद्र्याच्या फॅमिली कोर्टात कायदेशीरित्या घटस्फोट घेतला. सूत्रांच्या माहितीनुसार, अधुनाच्या आयुष्यात निकोलो मोरियाची एन्ट्री झाल्यामुळे त्यांच्या संसारात फूट पडली. तर फरहानचं नाव अभिनेत्री श्रद्धा कपूरसोबत जोडण्यात आलं. मात्र या दोघांनी यामागचं कारण कधीच सांगितलं नाही.