सारा आणि जान्हवी 'या' दोन सख्या भावांसोबत होत्या नात्यात, महाराष्ट्राच्या राजकारणाशी आहे त्यांचा जवळचा संबंध

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2022 06:00 IST2022-07-17T06:00:00+5:302022-07-17T06:00:02+5:30

सोशल मीडियावर अनेक युजर्सनी सारा आणि जान्हवीचे त्या दोन मुलांसोबतचे जुने फोटोही शोधून काढले आहेत

Did you know Sara Ali khan and Janhvi Kapoor dated Pahariya brothers reveled at koffee with karan 7 show 2 | सारा आणि जान्हवी 'या' दोन सख्या भावांसोबत होत्या नात्यात, महाराष्ट्राच्या राजकारणाशी आहे त्यांचा जवळचा संबंध

सारा आणि जान्हवी 'या' दोन सख्या भावांसोबत होत्या नात्यात, महाराष्ट्राच्या राजकारणाशी आहे त्यांचा जवळचा संबंध

कॉफी विथ करण 7 चा दुसरा एपिसोड सोशल मीडियावर धुमाकूळ घालतो आहे. या एपिसोडमध्ये  सारा अली खान आणि जान्हवी कपूर यांनी धुमाकूळ घातला.या दोघांची मैत्री कोणापासून लपून राहिलेली नाही. दोघांनाही एकत्र बाहेर जाताना, स्ट्रॉग बॉन्ड शेअर करताना सगळ्यांनी पाहिले, पण या दोघी एकमेकांच्या जाऊबाई होणार होत्या हे क्वचितच कोणाला माहीत असेल.
 

 'कॉफी विथ करण सीझन 7' मध्ये दोघींची अनेक सीक्रेट्स ओपन झाले. दोघांनी सांगितले की त्यांची मैत्री कशी सुरू झाली. त्याचवेळी करण जोहरनेही एक खुलासा केला जो ऐकून सगळेच थक्क झाले. करण जोहरने आपल्या शोमध्ये खुलासा केला की दोन्ही अभिनेत्रींनी 2 भावांना डेट केले आहे. करण म्हणाला, 'कोविडच्या आधीची गोष्ट आहे, आज तुमच्यातील मैत्री किती घट्ट आहे हे मला माहीत नाही, पण तुम्ही दोघांनी 2 भावांना डेट केले आहे, अर्थात भूतकाळात. आम्हा तिघांमध्ये जे बॉन्डिंग निर्माण झाले अशामुळे की ती दोन मुलं माझ्याच बिल्डिंगमध्ये राहायची. साहजिकच करणच्या या खुलाशानंतर प्रत्येकाला त्या दोन भावांबद्दल जाणून घ्यायची इच्छा आहे.

हे गुपित उघड झाल्यानंतर सोशल मीडियावर अनेक युजर्सनी सारा आणि जान्हवीचे त्या दोन मुलांसोबतचे जुने फोटोही शोधून काढले आहेत. वीर पहारिया आणि शिखर पहारिया अशी या दोन भावांची नावे आहेत. रिपोर्टनुसरा, दोघेही एका मोठ्या राजकीय कुटुंबातील आहेत आणि दोघेही महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचे नातू आहेत. साराने वीरला तर जान्हवीने शिखरला डेट केले आहे. दोघांचे जुने फोटो इंटरनेटवर चांगलेच व्हायरल होत आहेत.
 

Web Title: Did you know Sara Ali khan and Janhvi Kapoor dated Pahariya brothers reveled at koffee with karan 7 show 2