काय सांगता, परेश रावल यांची पत्नी आहे माजी मिस इंडिया, तरीही राहते लाइमलाइटपासून दूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2021 13:44 IST2021-01-07T13:37:53+5:302021-01-07T13:44:24+5:30

स्वरुप मिस इंडिया बनल्यानंतर परेश रावल यांना कुठेतरी एक वेगळीच भीती वाटत होती. स्वरूप संपत यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, परेश रावल यांना वाटायचे की आता पूर्वीसारखे काही राहणार नाही.आयुष्य पूर्ण बदलेले कुठेतरी मी त्यांच्यापासून दुरावेल या भीतीने ते निराश असायचे.

Did you know Paresh Rawal Wifr Swaroop Sampat was crowned Miss India in 1979 Also represent India at Miss Universe in the same year | काय सांगता, परेश रावल यांची पत्नी आहे माजी मिस इंडिया, तरीही राहते लाइमलाइटपासून दूर

काय सांगता, परेश रावल यांची पत्नी आहे माजी मिस इंडिया, तरीही राहते लाइमलाइटपासून दूर

सिनेमात हिरो हिरोईनशिवाय काही व्यक्तीरेखा अशा असतात की ज्या आपली छाप पाडतात. प्रत्येक भूमिकेत अभिनेता परेश रावल यांनी आपल्या अभिनयानं नवा प्राण ओतला मग तो संजय दत्तवर बनलेलला बायोपिक संजू मध्ये साकारलेली सुनिल दत्त यांची भूमिका असो किंवा मग ओ माय गॉड सिनेमात परेश रावलने साकारलेली कानजी लालजी मेहताची व्यक्तीरेखा असो. परेश रावल यांना पाहताच रसिकांच्याही चेहर-या न कळत एक वेगळाच आनंद झळकतो. सोशल मीडियावर परेश रावलही सक्रीय असून तेही त्यांची रोख ठोक मत मांडत चाहत्यांच्या लक्ष वेधून घेत असतात.

यावेळी मात्र परेश रावल यांच्यामुळे नाही तर त्यांच्या पत्नीच्या फोटोंमुळे परेश रावल चर्चेत आले आहेत. विशेष म्हणजे आपल्या कॉमेडी अंदाजाने चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण करणारे परेश रावल यांची पत्नीनेही मिस इंडियाचे किताब पटकावला आहे. एपरेश रावल यांची पत्नी स्वरूप संपत ही माजी मिस इंडिया आहे हे फार कमी लोकांना माहिती आहे. 

परेश रावल आणि स्वरुप यांची लव्हस्टोरीही तशी रंजक आहे.एका मुलाखती दरम्यान खुद्द परेश रावल यांनीच त्यांत्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला होता. स्वरूपचे वडील इंडियन नॅशनल थिएटरचे निर्माते होते. मी एकदा मित्रांसह एक बंगाली नाटक बघायला गेलो होतो. तेव्हा माझी नजर स्वरूप वर पडली. बघताच क्षणी परेश रावल पत्नीच्या प्रेमात पडले होते.त्यावेळी स्वरुप फक्त १६ वर्षाच्या होत्या. पहिल्या नजरेत स्वरुप यांच्यावर फिदा झाले होते परेश रावल.


नाटकात काम करत असताचनाच स्वरूप संपतच्या वडिलांनी त्यांना मिस इंडिया ब्युटी कॉन्टेस्टमध्ये भाग घेण्यास प्रोत्साहित केले होते, पण स्वरूपचा तसे करण्याचा काही हेतू नव्हता. भावाने आणि परेश रावल यांनी ब्युटी कॉन्टेस्टविषयी स्वरुप यांना सहभागी होण्यास सांगितले आणि स्वरुप यांनी मिस इंडियाचा किताबही मिळवला. सगळेकाही स्वप्नवतच तो क्षण त्यांच्यासाठी होता.

स्वरुप मिस इंडिया बनल्यानंतर परेश रावल यांना कुठेतरी एक वेगळीच भीती वाटत होती. स्वरूप संपत यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, परेश रावल यांना वाटायचे की आता पूर्वीसारखे काही राहणार नाही.आयुष्य पूर्ण बदलेले कुठेतरी मी त्यांच्यापासून दुरावेल या भीतीने ते निराश असायचे. मात्र शेवटी मीच पुढाकार घेतला आणि त्यांना माझ्या वडिलांकडे लग्नासाठी मागणी घालायला सांगितली, वडिलांनीही होकार दिला आणि आमचे लग्न लावून दिले. माझ्या घरात १२९ वर्षानंतर मुलीचे लग्न होत होते त्यामुळे सगळेच खूप आनंदी होते मी देखील माझ्या लग्नात खूप एन्जॉय केले.

 

Web Title: Did you know Paresh Rawal Wifr Swaroop Sampat was crowned Miss India in 1979 Also represent India at Miss Universe in the same year