एक हजारो में मेरी बहना है इमरान हाश्मीच्या बहिणीबद्दल माहितीय का?, ती देखील आहे टॉपची अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 12:38 PM2022-03-24T12:38:56+5:302022-03-24T13:01:19+5:30

अभिनेता इमरान हाश्मी आणि त्याच्या बहिणीची. इमरान हाश्मी प्रमाणेच त्याची बहीण सुद्धा अभिनय करते.

Did you know emraan hashmi is sister also a actress in bollywood | एक हजारो में मेरी बहना है इमरान हाश्मीच्या बहिणीबद्दल माहितीय का?, ती देखील आहे टॉपची अभिनेत्री

एक हजारो में मेरी बहना है इमरान हाश्मीच्या बहिणीबद्दल माहितीय का?, ती देखील आहे टॉपची अभिनेत्री

googlenewsNext

बॉलिवूडमध्ये अशा अनेक सेलिब्रिटी भाऊ-बहिणींच्या जोड्या मालिका-सिनेमांमधून रसिक प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाल्या आहेत. पण कदाचित रसिकांनाच खऱ्या आयुष्यात हे अभिनेता-अभिनेत्री एकमेकांचे  भाऊ बहिणी आहेत ते फारसं कुणाला ठाऊक नाहीत. यापैकीच एक जोडी आहे. अभिनेता इमरान हाश्मी आणि त्याच्या बहिणीची. इमरान हाश्मी प्रमाणेच त्याची बहीण सुद्धा अभिनय करते. अभिनेता इम्रान हाश्मी आज त्याचा 43वा वाढदिवस साजरा करतो आहे त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत. 

अभिनेता इमरान हाश्मीची बहीण बॉलिवूडची टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून आलिया भट आहे. इमरान हाश्मी हा महेश आणि मुकेश भट यांचा भाचा आहे. या नात्याने आलिया आणि पूजा भट त्याची कझिन आहे.  मात्र या नात्याबद्दल अनेक लोकांना माहिती नाही. इतकंच नव्हे तर इमरान हाश्मी 'विलन'फेम डायरेक्टर मोहित सूरी याचासुद्धा कझिन आहे.

इमरान हाश्मी प्रत्येक भूमिकेत अगदी फिट बसतो. अ‍ॅक्शनपासून तर रोमॅन्टिक अशा अनेक भूमिका त्याने केल्या आहेत. 2003 मध्ये ‘फुटपाथ’ या सिनेमातून इमरानने डेब्यू केला आणि यानंतर अनेक चित्रपटांत तो झळकला. 

वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर  इम्नान लवकरच सलमान खानसोबत झळकणार आहे. तसेच तो अक्षय कुमारच्या सेल्फी चित्रपटात सुद्धा दिसणार आहे. अक्षय आणि इमरान यांना पहिल्यांदाच एकत्र रुपेरी पडद्यावर काम करताना पाहणे कमालीचे ठरणार आहे. ड्रामा ने भरलेली ही एक अशी अनोख्या पद्धतीने रचलेली कथा असेल जी प्रेक्षकांना उत्सुकतेने आनंददायक ब्रेकवर घेऊन जाईल. राज मेहता दिग्दर्शित आणि स्वर्गीय अरुणा भाटिया, हिरू यश जोहर, सुप्रिया मेनन, करण जोहर, पृथ्वीराज सुकुमारन, अपूर्व मेहता आणि लिस्टिन स्टीफन निर्मित चित्रपट सेल्फी २०२२ मध्ये सिनेमागृहात येणार आहे. 
 

Web Title: Did you know emraan hashmi is sister also a actress in bollywood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.