बॉलिवूडच्या या अभिनेत्रीला ओळखलंत का?, आता बॉलिवूडमधून आहे गायब

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2021 07:00 IST2021-10-02T07:00:00+5:302021-10-02T07:00:00+5:30

बॉलिवूडच्या या अभिनेत्रीला आता ओळखणे कठीण झाले आहे.

Did you know this Bollywood actress? She is now missing from Bollywood | बॉलिवूडच्या या अभिनेत्रीला ओळखलंत का?, आता बॉलिवूडमधून आहे गायब

बॉलिवूडच्या या अभिनेत्रीला ओळखलंत का?, आता बॉलिवूडमधून आहे गायब

नव्वदच्या दशकातील अभिनेत्री मिनाक्षी शेषाद्रीने बॉलिवूडला अलविदा केले आहे आणि ती भारत सोडून विदेशात स्थायिक झाली आहे. मिनाक्षी शेषाद्री नव्वदीच्या काळात अतिशय सुंदर अभिनेत्री म्हणून ओळखली जायची. ​ती सोशल मीडियावर चाहत्यांसाठी फोटो शेअर करत असते. पण सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या तिच्या या फोटोंमध्ये तिचे वाढलेले वय दिसून येत आहे.  

मिनाक्षी शेषाद्रीने अनेक सिनेमात मुख्य भूमिका केल्या आहेत. तिच्या अनेक भूमिकांना प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली आहे. एक अभिनय क्षेत्रात येण्याआधी तिने मिस इंडिया हा किताब मिळवला होता.

तिचे खरे नाव हे शशिकला शेषाद्री असून मिस इंडिया बनल्यानंतर तिचे फोटो सगळ्या वर्तमानपत्रात छापून आले होते. हे फोटो मनोज कुमार यांनी पाहिल्यानंतर त्यांनी तिला पेंटर बाबू या चित्रपटासाठी विचारले आणि अशाप्रकारे मिनाक्षीचे बॉलिवूडमध्ये पदार्पण झाले. पण शशिकला नावाची अभिनेत्री बॉलिवूडमध्ये असल्यामुळे शशिकलाचे नाव बदलून मिनाक्षी ठेवण्यात आले.

पेंटर बाबू हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. पण या चित्रपटामुळे तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स मिळाल्या. हिरो या चित्रपटानंतर तिचे करियर संपूर्णपणे बदलून गेले.

बेवफाई, दिलवाला, दामिनी यांसारख्या चित्रपटांमध्ये मिनाक्षीने खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. तिला जुर्म आणि दामिनी या चित्रपटांसाठी अनेक पुरस्कारांनी सन्मानित देखील करण्यात आले आहे.

मिनाक्षीने १९९८ मध्ये स्वामी विवेकानंद या चित्रपटात काम केले होते. त्यानंतर हरिश मैसूर या इन्व्हेस्टमेंट बँकरसोबत लग्न केल्यानंतर मिनाक्षी परदेशात स्थायिक झाली आणि त्यानंतर ती चित्रपटांमध्ये झळकली नाही. शेवटची ती घायल वन्स अगेन या चित्रपटात पाहायला मिळाली होती.

Web Title: Did you know this Bollywood actress? She is now missing from Bollywood