टायगर श्रॉफची आई आयेशा श्रॉफ मोहनीश बहलसह झळकली होती या सिनेमात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2017 13:25 IST2017-03-04T06:44:14+5:302017-03-04T13:25:20+5:30

बॉलिवूडचा 'हिरो' अर्थात जॅकी दादा याच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत. आपल्या अभिनयानं जॅकी श्रॉफ गेल्या अनेक वर्षांपासून रसिकांचं मनोरंजन ...

Did Tiger Shroff's mother Ayesha Shroff appear with Mohnish Bahl in this film? | टायगर श्रॉफची आई आयेशा श्रॉफ मोहनीश बहलसह झळकली होती या सिनेमात?

टायगर श्रॉफची आई आयेशा श्रॉफ मोहनीश बहलसह झळकली होती या सिनेमात?

लिवूडचा 'हिरो' अर्थात जॅकी दादा याच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत. आपल्या अभिनयानं जॅकी श्रॉफ गेल्या अनेक वर्षांपासून रसिकांचं मनोरंजन करतायत. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत त्यांचा लेक टायगर श्रॉफ यानंही रुपेरी पडद्यावर हिरोपंती दाखवलीय. पहिल्याच सिनेमापासून टायगरनं आपला अभिनय आणि विशेष अशा डान्स स्टाईलनं रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलंय. जॅकी श्रॉफची कन्याही कृष्णाही आपल्या अदा आणि स्टाईलमुळे सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असते. जॅकी, टायगर आणि कृष्णाप्रमाणेच आयेशा श्रॉफही तितकीच गाजली होती. आता ही आयेशा श्रॉफ कोण असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. आयेशा म्हणजेच जॅकी श्रॉफची पत्नी आणि टायगर-कृष्णाची आई. कधीकाळी आयेशासुद्धा अभिनेत्री होती हे सा-यांनाच माहिती आहे. मात्र आयेशानं कोणत्या सिनेमात आणि कोणत्या नायकासोबत काम केलं होतं हे ब-याच जणांना माहिती नाही. कोणत्या हिरोबरोबर आयेशानं रुपेरी पडदा गाजवला होता. हे माहित नसावे. याच गोष्टींचा खुलासा करणार आहोत. हे वाचून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय वाटल्याशिवाय राहणार नाही. बॉलीवुडमध्ये एंट्री करण्यापूर्वी आयेशा मॉडेलिंग करत होती. मॉडेलिंग करता करता ती सिनेमांकडे वळली. 1984 साली  'तेरी बाहों में' या सिनेमात आयेशा झळकली. या सिनेमातील आयेशाच्या भूमिकेची आणि तिच्या खास लूकची त्यावेळी बरीच चर्चा झाली. कारण या सिनेमात आयेशा बिकनी लूकमध्ये रुपेरी पडद्यावर अवतरली होती. अभिनेता मोहनीश बहलसह रोमान्स करतानाचे सीन्स त्यावेळी चर्चेचा विषय ठरले होते.  या सिनेमात आयेशाने मोहनीश बहलसह खूप बोल्ड आणि हॉट सीन्स दिले होते. सिनेमातील हॉट आणि सेक्सी सीन्समुळे सिनेमाची खूप चर्चाही झाली होती. या सिनेमानंतर मोहनीश बहललने सिनेसृष्टीत आपले काम सुरूच ठेवले. मात्र आयेशा सिनेइंडस्ट्रीपासून लांब गेली. अभिनयापासून दूर गेल्यानंतर आयेशानं निर्मिती क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला. अभिनय करिअरनंतर आयेशा निर्मातीक्षेत्रात उतरली होती. 'बूम', 'ग्रहण', 'जिस देस में गंगा रेहता है', 'बॉम्बिल एंड बीटराईस' यासारख्या सिनेमांची निर्मिती तिने केली आहे.

Web Title: Did Tiger Shroff's mother Ayesha Shroff appear with Mohnish Bahl in this film?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.