अचानक लग्न पुढे ढकललं; आता स्मृती पाठोपाठ पलाशनेही डिलीट केले दोघांचे फोटो? नेमकं काय घडतंय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 12:10 IST2025-12-03T12:09:32+5:302025-12-03T12:10:45+5:30
लग्न पुढे ढकल्यानंतर स्मृतीने तिच्या अकाऊंटवरुन पलाशसोबतचे साखरपुडा, संगीत सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ डिलीट केले. त्यामुळे त्यांचं नातं बिनसल्याचंही बोललं जाऊ लागलं. आता स्मृतीनंतर पलाशनेही दोघांचे फोटो आणि व्हिडीओ डिलीट केल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

अचानक लग्न पुढे ढकललं; आता स्मृती पाठोपाठ पलाशनेही डिलीट केले दोघांचे फोटो? नेमकं काय घडतंय?
भारताची स्टार क्रिकेटर स्मृती मानधाना आणि बॉलिवूड सिंगर पलाश मुच्छल त्यांच्या पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत आहेत. २३ नोव्हेंबरला स्मृती आणि पलाशचं लग्न होणार होतं. संगीत, मेहेंदी असे लग्नाचे कार्यक्रमही सुरू होते. मात्र अचानक लग्नाच्याच दिवशी स्मृती आणि पलाशचा विवाहसोहळा पुढे ढकलण्यात आला. स्मृतीच्या वडिलांची तब्येत बिघडल्याने लग्नसोहळा रद्द केल्याचं कारण देण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर पलाशने स्मृतीला चीट केल्याच्या चर्चा सुरू झाल्या.
लग्न पुढे ढकल्यानंतर स्मृतीने तिच्या अकाऊंटवरुन पलाशसोबतचे साखरपुडा, संगीत सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ डिलीट केले. त्यामुळे त्यांचं नातं बिनसल्याचंही बोललं जाऊ लागलं. आता स्मृतीनंतर पलाशनेही दोघांचे फोटो आणि व्हिडीओ डिलीट केल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. स्मृतीसोबतचं लग्न रद्द झाल्यानंतर पलाशनेही मोठा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. मात्र, तसं काहीही घडलेलं नाही. पलाशने स्मृतीसोबतचे फोटो किंवा व्हिडीओ डिलीट केलेले नाहीत. त्याच्या अकाऊंटवर स्मृतीसाठी केलेल्या खास पोस्ट अजूनही तशाच आहेत. याशिवाय स्मृतीला क्रिकेटच्या मैदानावर प्रपोज केल्याचा व्हिडीओही त्याने अकाऊंटवरुन हटवलेला नाही. त्यामुळे या निव्वळ अफवा आहेत.
स्मृतीसोबत लग्न पुढे ढकलल्यानंतर पलाशची प्रकृतीही अचानक बिघडली होती. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काही दिवसांनी त्याला डिस्चार्जही मिळाला. नुकतंच पलाशला प्रेमानंद महाराज यांच्या आश्रमात स्पॉट करण्यात आलं. पलाश प्रेमानंद महाराज यांचे आशीर्वाद घेण्यासाठी गेला होता. मात्र अद्याप पलाश किंवा स्मृतीने त्यांच्या नात्याबद्दल किंवा पुढे ढकललेल्या लग्नाबद्दल कोणतंही भाष्य केलेलं नाही.