सुशांत सिंग राजपूतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेने बॉयफ्रेंडसोबत गुपचूप उरकला साखपुडा, फोटो शेअर करत दिली हिंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2020 12:30 IST2020-06-10T12:22:27+5:302020-06-10T12:30:57+5:30

अंकिता तिच्या पर्सनल लाईफला घेऊन चर्चेत आली आहे

Did ankita lokhande engaged with vikki jain | सुशांत सिंग राजपूतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेने बॉयफ्रेंडसोबत गुपचूप उरकला साखपुडा, फोटो शेअर करत दिली हिंट

सुशांत सिंग राजपूतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेने बॉयफ्रेंडसोबत गुपचूप उरकला साखपुडा, फोटो शेअर करत दिली हिंट

'बागी ३' चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूप चांगला रिस्पॉन्सही मिळाला. मणिकर्णिकामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री अंकिता लोखंडेनेबागी ३ चित्रपटात काम केले आहे. तिने साकारलेल्या भूमिकेचंही खूप कौतूक झालं. अंकिता तिच्या पर्सनल लाईफला घेऊन चर्चेत आली आहे. अंकिता व विकी जैन या दोघांचा रोमान्स अगदी जोरात सुरु आहे. अंकिता विकीसोबतचे फोटो इन्स्टाग्राम शेअर करत असते.

मीडिया रिपोर्टनुसार अंकिताने लॉकडाऊनमध्ये विकीसोबत गुपचूप साखरपुडा उरकला अशी चर्चा आहे. अंकिताने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती चेहऱ्यावर हात ठेऊन हसताना दिसतेय. या फोटोत तिच्या हातात असलेली हिऱ्याच्या अंगठीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. ''आपल्या आयुष्यातील पुढचा टप्पा हा आपल्याकडून काहीतरी वेगळेच मागत असतो.'' अंकिताच्या या कॅप्शनवरुन हा अंदाज लावण्यात येतो आहे की ती विकीसोबतचे नातं एक स्टेप पुढे घेऊन गेली आहे. 


अंकिता व विकीच्या अफेअरच्या चर्चा ब-याच दिवसांपासून सुरु आहेत. पण अंकिता यावर काहीही बोलायला तयार नव्हती. पण अखेर तिने या नात्याची कबुली दिली होती. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अंकिता काही काळ सिंगल होती. याचदरम्यान विकी जैन याने तिच्या आयुष्यात एन्ट्री घेतली. विकी जैनचा बॉलिवूडशी संबध नाही. तो एक उद्योगपती आहे. तो बॉक्स क्रिकेट लीगमधील मुंबई टीमचा को-ओनर आहे.


अंकिता लोखंडे हिने छोट्या पडद्यावरून कारकीर्दीला सुरूवात केली आहे. तिने पवित्र रिश्ता या मालिकेतून अभिनय क्षेत्रात तिने एन्ट्री केली. या मालिकेतून ती खूप लोकप्रिय झाली होती. त्यानंतर गेल्या वर्षी तिने कंगना रानौतची मुख्य भूमिका असलेला चित्रपट मणिकर्णिका चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 

Web Title: Did ankita lokhande engaged with vikki jain