सोशल मीडियावर व्हायरल झाला दिया मिर्झाचा हा व्हिडिओ, सगळीकडे आहे याचीच चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 12:27 IST2021-03-22T12:19:30+5:302021-03-22T12:27:16+5:30

दीयाने नुकताच तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

Dia Mirza’s video with a sleepy pooch is too cute to miss | सोशल मीडियावर व्हायरल झाला दिया मिर्झाचा हा व्हिडिओ, सगळीकडे आहे याचीच चर्चा

सोशल मीडियावर व्हायरल झाला दिया मिर्झाचा हा व्हिडिओ, सगळीकडे आहे याचीच चर्चा

ठळक मुद्देदीयाने शेअर केलेल्या व्हिडिओत ती एका क्यूट पपीसोबत दिसत आहे. दीया चित्रपटाच्या सेटवर दिसत असून ती पपीला जवळ घेऊन त्याचे लाड करताना दिसत आहे.

दीया मिर्झा सध्या तिच्या व्यवसायिक आयुष्यापेक्षा खाजगी आयुष्यामुळे जास्त चर्चेत आहे. दीया सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती तिचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिने नुकताच तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

दीयाने शेअर केलेल्या व्हिडिओत ती एका क्यूट पपीसोबत दिसत आहे. दीया चित्रपटाच्या सेटवर दिसत असून ती पपीला जवळ घेऊन त्याचे लाड करताना दिसत आहे. दीयाचा हा व्हिडिओ आठ लाख 52 हजाराहून अधिक लोकांनी पाहिलेला आहे. 

दीया मिर्झा काही दिवसांपूर्वी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली होती. तिने नुकतेच वैभव रेखीसोबत लग्न केले आहे. वैभव हा व्यवसायिक असून त्याचे देखील हे दुसरे लग्न आहे. दिया आणि वैभवच्या लग्नातील फोटो आणि व्हिडीओंनी तर इंटरनेटवर धुमाकूळ घातला होते.

दीयाचे लग्न अनेक कारणांमुळे खास ठरले. तिच्या लग्नात एका महिला पुजारीने सगळ्या विधी केल्या. शिवाय लग्नातील सगळ्या वस्तू इकोफ्रेंडली होत्या. प्लास्टिक आणि थर्माकॉलचा वापर पूर्णपणे टाळण्यात आला होता. आणखी एक खास बात म्हणजे, दियाच्या लग्नात कन्यादान आणि पाठवणी या दोन पारंपरिक विधींना फाटा देण्यात आला होता.

दीयाप्रमाणेच वैभवचे देखील हे दुसरे लग्न आहे. सुनैना रेखी असे त्याच्या पहिल्या पत्नीचं नाव आहे. ती एक योगा कोच आहे. बॉलिवूड सिनेसृष्टीतील अनेक नामांकित कलाकारांना ती योगाचे प्रशिक्षण देते. अंतर्गत मतभेदांमुळे त्यांचा घटस्फोट झाला होता.

दीयाने अनेक चित्रपटांमध्ये काम केले असले तरी रहना है तेरे दिल में मधील तिची भूमिका प्रेक्षकांना अधिक भावते. दीयाच्या अभिनयापेक्षा तिच्या सौंदर्याची अधिक चर्चा रंगते.

Web Title: Dia Mirza’s video with a sleepy pooch is too cute to miss