दीया मिर्झाच्या लग्नाचा थाट; पाहा, विवाह सोहळ्याचे व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2021 10:23 IST2021-02-16T10:22:00+5:302021-02-16T10:23:03+5:30
लाल रंगाची बनारसी साडी, केसात माळलेला फुलांचा गजरा आणि साजेसे दागिणे अशा थाटात दीया लग्नमंडपात आली, तेव्हा तिने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.

दीया मिर्झाच्या लग्नाचा थाट; पाहा, विवाह सोहळ्याचे व्हिडीओ
बॉलिवूड अभिनेत्री दीया मिर्झा काल सोमवारी बिझनेसमॅन वैभव रेखीसोबत विवाहबंधनात अडकली. तिच्या लग्नाचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. लाल रंगाची बनारसी साडी, केसात माळलेला फुलांचा गजरा आणि साजेसे दागिणे अशा थाटात दीया लग्नमंडपात आली, तेव्हा तिने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.
व्हिडीओ वधूच्या पोशाखात दीया मंडपात येत आहेत. लहान बच्चेकंपनी हातात वेगवेगळे कार्ड्स घेऊन तिच्या समोर चालताना दिसत आहेत आणि बॅकग्राऊंडमध्ये ‘दिल शगना दा’ हे गाणे वाजतेय.
पाली हिल येथील इमारत बेल एअरमध्ये दीयाचा लग्नसोहळा पार पडला लग्नानंतर ती आणि तिचा नवरा वैभव रेखी यांनी मीडियासमोर येत कॅमे-यांना पोज दिली. मीडियाला मिठाई वाटत, नवविवाहित जोडप्याने मीडियाचे आभार मानले.
या लग्न सोहळ्याला दीया आणि वैभवच्या जवळच्या लोकांच्या उपस्थितीत झाले. त्यांच्याशिवाय अदिती राव हैदरी, लारा दत्ता आणि जॅकी भगनानी यांनी हजेरी लावली होती.
दीयाच्या हृदयावर राज्य करणारा वैभव रेखी कोण आहे तर मोठा बिझनेसमॅन व इव्हेस्टर आहे. वैभव रेखी हा प्रसिद्ध व्यवसायिक मुंबईतील सगळ्यात प्रसिद्ध समजल्या जाणा-या पाली हिल परिसरात राहातो. वैभवचे देखील हे पहिले लग्न नाहीये.
त्याचे पहिले लग्न योगा आणि लाईफस्टाईल कोच सुनैना रेखीसोबत झाले होते. त्यांना एक मुलगी देखील आहे. लॉकडाऊनच्या दरम्यान दीया आणि वैभव एकमेकांच्या प्रेमात पडले असे म्हटले जाते. ते अनेक महिन्यांपासून एकमेकांसोबत नात्यात असून ते इन्स्टाग्रामवर देखील एकमेकांना फॉलो करतात. दीयाने मिस एशिया पॅसिफिकचा किताब पटकावल्यानंतर बॉलिवूडमधील दरवाजे खुले झाले. दीयाने हना है तेरे दिल में, तहजीब, कोई मेरे दिल में है, लगे रहो मुन्ना भाई आणि थप्पड या चित्रपटात काम केले आहे.