ही चिमुकली आपल्या सौंदर्यामुळे असते चर्चेत, मिळवला आहे मिस एशिया पॅसिफिकचा किताब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 17:07 IST2021-03-13T16:50:07+5:302021-03-13T17:07:36+5:30

हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

dia mirza shares childhood picture on social media | ही चिमुकली आपल्या सौंदर्यामुळे असते चर्चेत, मिळवला आहे मिस एशिया पॅसिफिकचा किताब

ही चिमुकली आपल्या सौंदर्यामुळे असते चर्चेत, मिळवला आहे मिस एशिया पॅसिफिकचा किताब

ठळक मुद्देदियाने शेअर केलेल्या फोटोत ती एका वाढदिवसाच्या पार्टीला गेलेली असून ती केककडे पाहात असल्याचे आपल्याला दिसत आहे. त्यामुळेच तिने मला केक पाहिजे... असे कॅप्शन या फोटोसोबत लिहिले आहे.

दिया मिर्झा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. तिने सोशल मीडियावर तिच्या बालपणीचा एक फोटो पोस्ट केला असून मला केक हवा... असे या फोटोसोबत लिहिले आहे.

दियाने शेअर केलेल्या फोटोत ती एका वाढदिवसाच्या पार्टीला गेलेली असून ती केककडे पाहात असल्याचे आपल्याला दिसत आहे. त्यामुळेच तिने मला केक पाहिजे... असे कॅप्शन या फोटोसोबत लिहिले आहे. दियाचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून काहीच तासांत 37 हजाराहून अधिक लोकांनी हा फोटो लाईक केला आहे.

दिया मिर्झा काही दिवसांपूर्वी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली होती. तिने नुकतेच वैभव रेखीसोबत लग्न केले आहे. वैभव हा व्यवसायिक असून त्याचे देखील हे दुसरे लग्न आहे. दिया आणि वैभवच्या लग्नातील फोटो आणि व्हिडीओंनी तर इंटरनेटवर धुमाकूळ घातला होते. 

दियाचे लग्न अनेक कारणांमुळे खास ठरले. तिच्या लग्नात एका महिला पुजारीने सगळ्या विधी केल्या. शिवाय लग्नातील सगळ्या वस्तू इकोफ्रेंडली होत्या. प्लास्टिक आणि थर्माकॉलचा वापर पूर्णपणे टाळण्यात आला होता. आणखी एक खास बात म्हणजे, दियाच्या लग्नात कन्यादान आणि पाठवणी या दोन पारंपरिक विधींना फाटा देण्यात आला होता.

दियाप्रमाणेच वैभवचे देखील हे दुसरे लग्न आहे. सुनैना रेखी असे त्याच्या पहिल्या पत्नीचं नाव आहे. ती एक योगा कोच आहे. बॉलिवूड सिनेसृष्टीतील अनेक नामांकित कलाकारांना ती योगाचे प्रशिक्षण देते. अंतर्गत मतभेदांमुळे त्यांचा घटस्फोट झाला होता.

दियाने अनेक चित्रपटांमध्ये काम केले असले तरी रहना है तेरे दिल में मधील तिची भूमिका प्रेक्षकांना अधिक भावते. दियाच्या अभिनयापेक्षा तिच्या सौंदर्याची अधिक चर्चा रंगते.

Web Title: dia mirza shares childhood picture on social media