'तू समजतेस कोण स्वत:ला?', दीया मिर्झावर भडकली करीना कपूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2021 17:54 IST2021-12-09T17:13:56+5:302021-12-09T17:54:09+5:30
करीना कपूर (kareena kapoor) नम्रताशी बोलत असताना अचानक दीया मिर्झा (Dia mirza) तिथं आली आणि..

'तू समजतेस कोण स्वत:ला?', दीया मिर्झावर भडकली करीना कपूर
दिया मिर्झाचा (Dia mirza) आज म्हणजेच 9 डिसेंबरला वाढदिवस (Dia mirza birthday) असून तिचा जन्म हैद्राबादमधील आहे. तिच्या सौंदर्यावर, हास्यावर तिचे फॅन्स फिदा आहेत. दिया मिर्झाने कॉलेजमध्ये असताना मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणूनही काम केलेले आहे. त्याचवेळी तिने अनेक प्रसिद्ध ब्रँडच्या प्रिंट आणि टीव्ही कमर्शियल्ससाठी मॉडेलिंग केले. 2000 मध्ये फेमिना मिस इंडियाचा किताब मिळवला. त्यानंतर ती मिस एशिया पॅसिफिक बनली. मिस एशिया पॅसिफिक बनल्यानंतर तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर येत होत्या. तिने रहेना है तेरे दिल में या चित्रपटाद्वारे तिच्या बॉलिवूडमधील करियरला सुरुवात केली. दिया दुसऱ्यांदा लग्नाच्या बेडीत अडकली.याचवर्षी दीयाने एका बाळाला जन्मसुद्धा दिला. एकदा करीनाने सर्वांसमोर रागात दियाला बरंच काही बोलली. दिया मिर्झाच्या 40 व्या वाढदिवसानिमित्त, चला जाणून घेऊया त्या किस्साविषयी..
दिया तिच्या शांत स्वभावासाठी ओळखली जाते. तर राग हा करिना कपूरच्या (kareena kapoor) नाकावरच असतो. एकदा लखनऊमध्ये एका कार्यक्रमात करीना आणि दिया मिर्झा व्यतिरिक्त बॉलिवूड अभिनेत्री नम्रता शिरोडकर आणि उर्मिला मातोंडकर देखील उपस्थित होत्या. शोसाठी सर्व अभिनेत्रींना सलवार सूट घालून हातात राष्ट्रध्वज धरावा लागला. पण करीना कपूरला काहीतरी वेगळं करायचं होतं.
या विषयावर करीना नम्रताशी बोलू लागली. दोघांमधील प्रकरण वाढत असल्याचे पाहून दिया मिर्झा नम्रताकडे गेली आणि म्हणाली की या प्रकरणावर सर्वांसमोर बोलण्यापेक्षा वेगळे जाऊन बोला.दिया आणि नम्रताचे बोलणे जेव्हा करीनाने ऐकले तेव्हा ती संतापली. करीना सर्वांसमोर दियावर ओरडू लागली आणि दियाला म्हणाली- तू कोण आहेस? जी नम्रताला सल्ला देतेस. यानंतर दिया खूप नाराज झाली आणि खोली सोडून तिथून निघून गेली. या प्रकरणानंतर करीना आणि दिया यांच्यात पुन्हा मैत्री झाली.