"मला तो सीन करायचा नव्हता पण, रणवीरने...", 'धुरंधर'मधल्या 'त्या' कामुक सीनबाबत अभिनेत्याचा मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 10:22 IST2025-12-30T10:21:03+5:302025-12-30T10:22:16+5:30
'धुरंधर'मध्ये सुरुवातीला रणवीर सिंग हमझा अली मदारी बनून पाकिस्तानात जातो तेव्हा लालू डकैतसोबत त्याची लढाई होते. तेव्हा लालू डकैत आणि हमझा अलीचा एक कामुक सीन दाखवण्यात आला आहे. या सीनबाबत लालू डकैतची भूमिका साकारलेला अभिनेता नसीम मुगलने भाष्य केलं आहे.

"मला तो सीन करायचा नव्हता पण, रणवीरने...", 'धुरंधर'मधल्या 'त्या' कामुक सीनबाबत अभिनेत्याचा मोठा खुलासा
'धुरंधर' सिनेमा केवळ भारतातच नाही तर जगभरात गाजत आहे. या सिनेमाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं आहे. 'धुरंधर'मधील गाणी आणि काही सीन्स सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. या सिनेमातील एका सीनबाबत तर सोशल मीडियावर प्रचंड चर्चाही रंगली आहे. 'धुरंधर'मध्ये सुरुवातीला रणवीर सिंग हमझा अली मदारी बनून पाकिस्तानात जातो तेव्हा लालू डकैतसोबत त्याची लढाई होते. तेव्हा लालू डकैत आणि हमझा अलीचा एक कामुक सीन दाखवण्यात आला आहे. या सीनबाबत लालू डकैतची भूमिका साकारलेला अभिनेता नसीम मुगलने भाष्य केलं आहे.
'धुरंधर'मधील तो सीन करण्यास सुरुवातीला नकार दिल्याचा खुलासा नसीमने फिल्मीज्ञानला दिलेल्या मुलाखतीत केला. तो म्हणाला, "त्या सीनबाबत काय सांगू... तो सीन खरंच आश्चर्यचकित करणारा होता. जेव्हा पहिल्यांदा या सीनबाबत मला सांगितलं तेव्हा मी सीन करण्यास नकार दिला होता. मी तो सीन करू शकेन असं मला वाटत नव्हतं. सीन वाचल्यानंतर मी खरं तर घाबरलो होतो. रणवीर सिंगसोबत तो सीन मला करायचा होता. पद्मावत नंतर मी रणवीरचा खूप मोठा फॅन झालो आहे. त्यामुळे त्याच्यासोबत मी हा सीन कसा करणार? असा प्रश्न मला पडला होता".
"पण, रणवीर सिंगमुळे तो सीन करणं शक्य झालं. त्या सीनच्या आधी आमचा अजून एक सीन होता. ज्यामध्ये आम्ही आलमच्या दुकानावर जातो. जिथे आमच्यासोबत बाबू डकैतही असतो. त्या सीनमध्येच रणवीरने मला कंम्फर्टेबल केलं. मी खरंच रणवीरसोबत काम करतोय का? यावर माझा विश्वास बसत नव्हता. तो एक मोठा स्टार आहे, हे तुम्हाला कधीच जाणवू देत नाही. 'धुरंधर'मधील त्या कामुक सीनसाठी आम्ही दोन टेक घेतले", असंही नसीमने सांगितलं.