'धुरंधर'चा उजैर बलोच 'या' बॉलिवूड अभिनेत्रीला करतोय डेट? अभिनेत्याचे रोमँटिक फोटो समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 12:56 IST2025-12-23T12:55:38+5:302025-12-23T12:56:20+5:30
दानिशचा वाढदिवस झाला. त्याच्या वाढदिवशी बॉलिवूड अभिनेत्रीने खास पोस्ट शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या. या पोस्टमुळे ते दोघे डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

'धुरंधर'चा उजैर बलोच 'या' बॉलिवूड अभिनेत्रीला करतोय डेट? अभिनेत्याचे रोमँटिक फोटो समोर
'धुरंधर' सिनेमातील कलाकारांच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक होत आहे. या सिनेमात रहमान डकैतचा भाऊ उजैर बलोचची भूमिका अभिनेता दानिश पंडोरने केली आहे. या भूमिकेमुळे दानिश प्रसिद्धीझोतात आला आहे. नुकताच दानिशचा वाढदिवस झाला. त्याच्या वाढदिवशी बॉलिवूड अभिनेत्री अहाना कुमराने खास पोस्ट शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या. या पोस्टमुळे ते दोघे डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
अहानाने दानिशसोबतचे काही रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. "माझ्या आयुष्यातील सगळ्यात दयाळू मुलाला Happy Birthday! तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण व्हावी, यासाठी प्रार्थना करेन. तुला प्रेम, यश आणि आनंद मिळो ज्यावर तुझा अधिकार आहे. नेहमी तुझ्यासोबत चांगलंच घडो यासाठी शुभेच्छा. डॅनी बॉय, तुझं हे वर्ष Dhu-Ran-Dan असो!!", असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.
दानिश आणि अहानाच्या या फोटोंमुळे ते एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. अहानाच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंटमध्येही त्यांच्या डेटिंगचा अंदाज व्यक्त केला आहे. तर दानिशने अहानाच्या पोस्टवर कमेंट करत तिचे आभार मानले आहेत.