Video: 'धुरंधर'मधील 'शरारत' गाण्यावर ७० वर्षांच्या आजींचा डान्स, अनुपमाच्या आईचा जलवा पाहून चाहतेही थक्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 14:03 IST2025-12-24T14:02:45+5:302025-12-24T14:03:11+5:30
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये ७० वर्षांच्या आजी त्याच्या मुलासोबत 'शरारत' गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. गाण्यात आहे हुबेहुब तसाच डान्स त्या करत असल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे.

Video: 'धुरंधर'मधील 'शरारत' गाण्यावर ७० वर्षांच्या आजींचा डान्स, अनुपमाच्या आईचा जलवा पाहून चाहतेही थक्क
'धुरंधर' सिनेमातील गाण्यांनी चाहत्यांना वेड लावलं आहे. या सिनेमातील गाण्यांवर रील व्हिडीओ व्हायरल होत आहेत. 'धुरंधर' सिनेमातील 'शरारत', 'कारवान', 'FA9LA' या गाण्यावरील रील्सने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. सिनेमातील 'शरारत' गाणंही हिट ठरत आहे. या गाण्यावर ७० वर्षांच्या आजीबाईंनी डान्स केला आहे. याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये ७० वर्षांच्या आजी त्याच्या मुलासोबत 'शरारत' गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. गाण्यात आहे हुबेहुब तसाच डान्स त्या करत असल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. त्यांचे डान्स मुव्हस पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. व्हिडीओत दिसणाऱ्या या आजीबाई म्हणजे अभिनेत्री रुपाली गांगुलीची आई आहे. व्हिडीओमध्ये त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा आणि कोरिओग्राफर विजय गांगुलीही डान्स करत आहे. विजय गांगुलीने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन हा व्हिडीओ शेअर केला आहे.
दरम्यान, 'धुरंधर'मधील 'शरारत' गाण्यात क्रिस्टल डिसुझा आणि आयेशा खान यांनी जलवा दाखवला आहे. तर विजय गांगुलीने हे गाणं कोरिओग्राफ केलं आहे. 'धुरंधर' सिनेमात रणवीर सिंग, सारा अर्जुन, आर माधवन, अर्जुन रामपाल, अक्षय खन्ना यांच्या मुख्य भूमिका आहेत.