शाहरुख खान अन् भन्साळीही वापरणार 'धुरंधर' फॉर्म्युला? 'किंग' अन् 'लव्ह अँड वॉर' दोन भागांमध्ये येणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 10:31 IST2026-01-03T10:30:23+5:302026-01-03T10:31:05+5:30
सिनेमे दोन भागांमध्ये रिलीज करण्याची लाटच आली आहे.

शाहरुख खान अन् भन्साळीही वापरणार 'धुरंधर' फॉर्म्युला? 'किंग' अन् 'लव्ह अँड वॉर' दोन भागांमध्ये येणार
आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुरंधर अशी कमाई केली आहे. अनेकांनी तर सिनेमा दोन वेळा तर काहींनी तीन वेळाही पाहिला. चाहते आता मार्च मध्ये येणाऱ्या सिनेमाच्या दुसऱ्या पार्टची प्रतिक्षा करत आहेत. दरम्यान बॉलिवूड विश्वातून एक नवी माहिती समोर येत आहे. 'धुरंधर'चा पॅटर्न बघता आता संजय लीला भन्साळी आणि शाहरुख खानही आपले आगामी सिनेमे दोन भागांमध्ये रिलीज करण्याच्या तयारीत आहेत.
'बॉलिवूड हंगामा'च्या रिपोर्टनुसार, शाहरुख खानचा 'किंग' आणि संजय लीला भन्साळींचा 'लव्ह अँड वॉर' दोन भागांमध्ये रिलीज करण्यावर विचार सुरु आहे. रिपोर्टमध्ये असंही म्हटलं आहे की हे दोन्ही सिनेमे बिग बजेट आहेत. मेकर्सने ऑन पेपर जितका खर्च लिहिला त्यापेक्षा जास्त खर्च शूटिंगवेळी झाला आहे. अशात शाहरुख आणि भन्साळी आपापले सिनेमे ६ महिन्यांच्या अंतराने प्रदर्शित करण्याच्या विचारात आहेत. 'लव्ह अँड वॉर'चा पहिला पार्ट यावर्षी तर दुसरा पार्ट २०२७ मध्ये येईल. तर शाहरुख खानचा पहिला पार्ट सप्टेंबर आणि दुसरा पार्ट मार्च २०१७ मध्ये रिलीज होईल. तसंच सिनेमा दोन भागांमध्ये दाखवायचा असेल तर मेकर्सकडे तेवढं फुटेज असणंही गरजेचं आहे. त्यामुळे सध्या हा विषय विचाराधीन आहे.
'धुरंधर'नंतर अनेक फिल्ममेकर्स मोठ्या कथा दोन भागांमध्ये दाखवण्याचा विचार करत आहेत. यामुळे सॅटेलाइट आणि डिजीटल कमाईचा फायदा होतोच सोबतच मेकर्सला आपली क्रिएटिव्हिटी दाखवण्यासाठीही अधिकचा वेळ मिळतो. सध्या 'किंग' आणि 'लव्ह अँड वॉर' अधिकृत रिलीज डेटची सगळे वाट पाहत आहेत.
शाहरुख खानच्या 'किंग'मध्ये त्याची लेक सुहाना खान, दीपिका पादुकोण, अभिषेक बच्चन, अभय वर्मा यांची भूमिका आहे. तर भन्साळींच्या 'लव्ह अँड वॉर'मध्ये रणबीर कपूर, विकी कौशल आणि आलिया भट ही तिकडी आहे. दुसरीकडे रणबीर कपूरचा बहुप्रतिक्षित बिग बजेट 'रामायण' सिनेमाही दोन भागांमध्ये रिलीज होणार आहे.