"२१ कोटींची मागणी आणि...", अक्षय खन्नाची 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट, अखेर खरं कारण समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 15:10 IST2025-12-26T15:09:47+5:302025-12-26T15:10:29+5:30
अक्षय खन्ना आणि 'दृश्यम ३'च्या निर्मात्यांमध्ये मतभेद झाल्याने आणि अभिनेत्याने अचानक फी वाढवल्याने सिनेमातून एक्झिट घेतल्याचं बोललं जात होतं. यामागचं खरं कारण अखेर आता समोर आलं आहे.

"२१ कोटींची मागणी आणि...", अक्षय खन्नाची 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट, अखेर खरं कारण समोर
'धुरंधर' सिनेमामुळे अक्षय खन्नाचा भाव वधारला आहे. सिनेमात त्याने साकारलेल्या रहमान डकैतच्या भूमिकेचं प्रचंड कौतुक होत आहे. धुरंधरमुळे मिळालेल्या प्रसिद्धीमुळे अक्षय खन्नाच्या डिमांडही वाढल्या आहे. धुरंधरनंतर अक्षय खन्ना 'दृश्यम ३'मध्ये दिसणार होता. मात्र या सिनेमातून त्याने काढता पाय घेतल्याचं वृत्त होतं. अक्षय खन्ना आणि 'दृश्यम ३'च्या निर्मात्यांमध्ये मतभेद झाल्याने आणि अभिनेत्याने अचानक फी वाढवल्याने सिनेमातून एक्झिट घेतल्याचं बोललं जात होतं. यामागचं खरं कारण अखेर आता समोर आलं आहे.
बॉलिवूड हंगामाच्या सूत्रांनी असं म्हटलं की, "अक्षय खन्नाला छावा आणि धुरंधर सिनेमातील व्हिलनच्या भूमिकेमुळे चांगली प्रसिद्धी मिळाली आहे. आता तो एक मोठा स्टार झाला आहे. त्यामुळेच त्याने त्याच्या फीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला. 'दृश्यम ३'साठी त्याने निर्मात्यांकडे तब्बल २१ कोटींची मागणी केली. अक्षय खन्नाच्या या मागणीमुळे निर्माते हैराण झाले. एवढी मोठी रक्कम फी म्हणून देणे शक्य नाही. त्यामुळे सिनेमाच्या बजेटवर परिणाम होईल, असं निर्मात्यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. पण, अक्षय खन्नाला असं वाटतंय की त्याची मागणी योग्य आहे. माझ्यामुळे या चाहत्यांमध्ये सिनेमाची उत्सुकता वाढली आहे, असं त्याला वाटतं".
अक्षय खन्ना आणि निर्मात्यांमध्ये मतभेद आहेत. अक्षय खन्नाने 'दृश्यम ३'मध्ये विग घालण्याची डिमांडही केली आहे. पण, निर्मात्यांना अक्षय खन्नाची ही अट मान्य नाही. कारण अक्षय खन्नाने 'दृश्यम २'मध्ये विग घातलेला नाही. मागण्या पूर्ण न झाल्यामुळेच अक्षय खन्नाने 'दृश्यम ३'मधून एक्झिट घेतली आहे, अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे.