"तेव्हा खरोखरच चौधरी अस्लम असल्याचा भास झाला...", 'धुरंधर २' बघितल्यानंतर पाकिस्तानी पोलिसाच्या पत्नीने केलं संजय दत्तचं कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 10:43 IST2026-04-03T10:41:54+5:302026-04-03T10:43:41+5:30
'धुरंधर २'मध्ये संजय दत्तला पाहून चौधरी अस्लमच्या खऱ्या पत्नीला त्याची आठवण आली आहे. 'धुरंधर २' पाहिल्यानंतर तिने संजय दत्तचं कौतुक केलं आहे.

"तेव्हा खरोखरच चौधरी अस्लम असल्याचा भास झाला...", 'धुरंधर २' बघितल्यानंतर पाकिस्तानी पोलिसाच्या पत्नीने केलं संजय दत्तचं कौतुक
'धुरंधर २'मुळे संजय दत्त पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 'धुरंधर' आणि 'धुरंधर २'मध्ये संजय दत्तने पाकिस्तानी पोलीस अधिकारी चौधरी अस्लमची भूमिका साकारली आहे. त्याच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुकही होत आहे. 'धुरंधर २'मध्ये संजय दत्तला पाहून चौधरी अस्लमच्या खऱ्या पत्नीला त्याची आठवण आली आहे. 'धुरंधर २' पाहिल्यानंतर तिने संजय दत्तचं कौतुक केलं आहे.
चौधरी अस्लमची पत्नी नौरीन अस्लम हिने आजतक रेडिओला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने संजय दत्तचं कौतुक केलं. ती म्हणाली, "जेव्हा संजय दत गाडीजवळ उभा असतो आणि डोळे वर करून बघतो तेव्हा तो एका क्षणासाठी खरंच चौधरी अस्लम असल्यासारखा मला भास झाला. जे पाकिस्तानी पोलिसांना करता आलं नाही. ते सगळे टास्क अस्लमने त्याच्या कारकीर्दीत केले होते. मी सिनेमा पूर्ण पाहिलेला नाही. जेव्हा गाडीचा ब्लास्ट होतो मी तिथपर्यंतच सिनेमा पाहिला. संजय दत्तने खूप शिव्या दिल्या आहेत. त्यामुळे हा सिनेमा कुटुंबासोबत नाही बघू शकत. पण, त्या शिव्या त्याच्या पात्राला शोभून दिसतात. पोलिस डिपार्टमेंटमध्ये अशा शिव्या नॉर्मल गोष्ट आहे".
संजय दत्तचं कौतुक करण्यासोबतच 'धुरंधर २'मध्ये दाखवण्यात आलेल्या चौधरी अस्लमच्या पात्रावर नौरीनने नाराजीही व्यक्त केली. "जर मेकर्सने पोलीस किंवा पत्रकारांचा सल्ला घेतला असता तर चौधरी अस्लमच्या पात्राला आणखी चांगल्या पद्धतीने बॅलन्स दाखवता येऊ शकलं असतं", असं नौरीन म्हणाली.