"मला काहीच फरक पडत नाही...", 'धुरंधर २'ला प्रपोगंडा सिनेमा म्हणत असतानाच दिग्दर्शक आदित्य धरचा व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 13:36 IST2026-03-24T13:36:18+5:302026-03-24T13:36:59+5:30

'धुरंधर २' प्रपोगंडा सिनेमा असल्याचं म्हटलं जात आहे. अशातच आदित्य धरचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये तो प्रपोगंडा सिनेमा म्हणत असलेल्या लोकांना उत्तर देताना दिसत आहे. 

dhurandhar 2 director aditya dhar video viral slams who said propoganda movie | "मला काहीच फरक पडत नाही...", 'धुरंधर २'ला प्रपोगंडा सिनेमा म्हणत असतानाच दिग्दर्शक आदित्य धरचा व्हिडीओ व्हायरल

"मला काहीच फरक पडत नाही...", 'धुरंधर २'ला प्रपोगंडा सिनेमा म्हणत असतानाच दिग्दर्शक आदित्य धरचा व्हिडीओ व्हायरल

Dhurandhar 2: आदित्य धरचं दिग्दर्शन असलेला 'धुरंधर २' १९ मार्चला सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. प्रदर्शित होताच 'धुरंधर २'ने बॉक्स ऑफिसवर धमाका केला आहे. 'धुरंधर'नंतर 'धुरंधर २'कडून चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. पण, या सिनेमाला आता ट्रोलही केलं जात आहे. 'धुरंधर २' प्रपोगंडा सिनेमा असल्याचं म्हटलं जात आहे. अशातच आदित्य धरचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये तो प्रपोगंडा सिनेमा म्हणत असलेल्या लोकांना उत्तर देताना दिसत आहे. 

आदित्य धरच्या याआधीच्याही काही सिनेमांना प्रपोगंडा म्हटलं गेलं होतं. आर्टिकल ३७० सिनेमालाही प्रपोगंडा म्हणत आदित्यला ट्रोल केलं गेलं होतं. तेव्हा आदित्य धरने ट्रोल करणाऱ्यांना स्पष्ट शब्दांत उत्तर दिलं होतं. "लोक काय म्हणतात, याने मला काहीच फरक पडत नाही. खासकरुन ते लोक जे अजेंटा ड्राडव्हन क्रिटिक्स करतात. पण भारतीय प्रेक्षक स्मार्ट आहेत. जेव्हा ते सिनेमा बघतात तेव्हा त्यांना कळतं की कोणता सिनेमा प्रपोगंडा आणि कोणत्या सिनेमाचा कंटेट योग्य आहे". 


"जोपर्यंत माझ्या सिनेमाचा मी निर्माता, दिग्दर्शक असेन तोपर्यंत माझ्या सिनेमाचा उद्देश नेहमी योग्यच असेल. ज्यावेळी माझा उद्देश वेगळा असेल मी सिनेमा बनवणं सोडून देईन. प्रपोगंडा म्हणणाऱ्या लोकांचा विचार मी करत नाही. त्यांच्या डोक्यातच प्रपोगंडा भरलेला आहे. त्यामुळेच त्यांना सिनेमा प्रपोगंडा वाटतो", असंही आदित्य धर म्हणाला होता. आता 'धुरंधर २'वर प्रपोगंडा अशी टीका होत असतानाच आदित्य धरचा हा व्हिडीओ पुन्हा व्हायरल होत आहे. 

Web Title : आदित्य धर का 'धुरंधर 2' को प्रोपेगैंडा बताने पर जवाब, वीडियो वायरल।

Web Summary : आदित्य धर की 'धुरंधर 2' पर प्रोपेगैंडा के आरोप लगे हैं। धर ने आलोचकों को खारिज करते हुए कहा कि उनकी फिल्मों का उद्देश्य नेक है। उन्हें भारतीय दर्शकों पर भरोसा है कि वे असली कंटेंट को प्रोपेगैंडा से अलग कर सकते हैं। विवाद के बीच एक पुराना वीडियो फिर से सामने आया।

Web Title : Aditya Dhar responds to 'Dhurandhar 2' propaganda claims, video viral.

Web Summary : Aditya Dhar's 'Dhurandhar 2' faces propaganda accusations. Dhar dismisses critics, asserting his films have a righteous purpose. He trusts Indian audiences to discern genuine content from propaganda. A past video resurfaces amid the controversy.