"शाहरुखलाच कास्ट करायचं होतं...", 'धुरंधर'मधल्या अर्शद पप्पूची किंग खानशी तुलना, अभिनेता म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 15:17 IST2026-04-08T15:16:22+5:302026-04-08T15:17:42+5:30

'धुरंधर'मधील अर्शद पप्पूचा लूक आणि शाहरुखचा मेट गाला २०२५ मधला लूक सारखाच दिसत आहे. याचे फोटो आणि काही मीम्स सोशल मीडियावर व्हायरल झाले.

dhurandhar 2 arshad pappu play by actor ashwin dhar look compared to shah rukh khan | "शाहरुखलाच कास्ट करायचं होतं...", 'धुरंधर'मधल्या अर्शद पप्पूची किंग खानशी तुलना, अभिनेता म्हणाला...

"शाहरुखलाच कास्ट करायचं होतं...", 'धुरंधर'मधल्या अर्शद पप्पूची किंग खानशी तुलना, अभिनेता म्हणाला...

'धुरंधर द रिव्हेंज' सिनेमाची क्रेझ काही केल्या संपत नाहीये. या सिनेमात अर्शद पप्पूची भूमिका साकारलेला अभिनेता अश्विन धरची तुलना शाहरुख खानसोबत होत आहे. 'धुरंधर'मधील अर्शद पप्पूचा लूक आणि शाहरुखचा मेट गाला २०२५ मधला लूक सारखाच दिसत आहे. याचे फोटो आणि काही मीम्स सोशल मीडियावर व्हायरल झाले. याबाबत बोलताना अश्विन धर म्हणाला, "हे खरं तर माझ्यासाठी सरप्राइज होतं. काही मीम्समध्ये असं म्हटलं होतं की आदित्य धरने अर्शद पप्पूच्या भूमिकेसाठी शाहरुख खानलाच कास्ट करायला हवं होतं. ते माझ्यासाठी खरंच आश्चर्यकारक होतं. पण शाहरुख खानशी झालेल्या तुलनेने मला छान वाटलं. मग ती कॉस्च्युम आणि लूकसाठी झालेली होती तरीही...". 

"ते मीम्स माझ्या टीमने शेअर केले होते. सुरुवातीला आम्ही सगळेच खूप हसत होतो. पण त्यानंतर ते खूप व्हायरल झालं. अनेक मीम्स होते ज्यामध्ये शाहरुख आणि माझ्या अर्शद पप्पूच्या लूकची तुलना होत होती. शाहरुखसारख्या अभिनेत्यासोबत आणि उत्तम व्यक्तीसोबत मीममध्ये का होईना फ्रेम शेअर करणं माझ्यासाठी सुखकारक होतं. मला खात्री आहे की आमची लवकरच भेट होईल आणि जेव्हा भेट होईल तेव्हा मी त्याला याबाबत नक्कीच सांगेन", असंही त्याने पुढे सांगितलं. 

दरम्यान, 'धुरंधर २' १९ मार्चला सर्वत्र प्रदर्शित झाला होता. आत्तापर्यंत सिनेमाने १००० कोटींचा गल्ला पार केला आहे. या सिनेमात रणवीर सिंग, सारा अर्जुन, आर माधवन, अर्जुन रामपाल, राकेश बेदी यांच्या मुख्य भूमिका आहेत. तर आदित्य धरने सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. 

Web Title : 'धुरंधर' में अभिनेता की शाहरुख से तुलना, अभिनेता ने दी प्रतिक्रिया

Web Summary : 'धुरंधर' में अश्विन धर की भूमिका की शाहरुख खान से तुलना हो रही है। अभिनेता शाहरुख खान के साथ अपने लुक की तुलना करने वाले मीम्स से खुश हैं। उन्हें उम्मीद है कि वे जल्द ही शाहरुख से मिलेंगे और इस बारे में बात करेंगे। फिल्म 'धुरंधर 2' ने ₹1000 करोड़ कमाए।

Web Title : Actor's 'Dhurandhar' look compared to SRK, actor responds with delight.

Web Summary : Ashwin Dhar's role in 'Dhurandhar' sparks SRK comparisons. The actor is flattered by the memes comparing his look to Shah Rukh Khan's, finding humor and honor in the association. He hopes to share this with SRK soon. The film 'Dhurandhar 2' has grossed ₹1000 crore.