‘धोनी: दी अनटोल्ड स्टोरी’चा मराठी ट्रेलर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2016 22:28 IST2016-08-18T13:53:08+5:302016-08-18T22:28:58+5:30

कॅप्टन कूल महेन्द्रसिंह धोनी याच्या आयुष्यावर बेतलेला ‘धोनी : दी अलटोल्ड स्टोरी’ या चित्रपटाचा मराठी ट्रेलर आज रिलीज झाला. अभिनेता रितेश देशमुख याने हा ट्रेलर लॉन्च केला.

'Dhoni: The Untold Story' Marathi Trailer Release | ‘धोनी: दी अनटोल्ड स्टोरी’चा मराठी ट्रेलर रिलीज

‘धोनी: दी अनटोल्ड स्टोरी’चा मराठी ट्रेलर रिलीज

प्टन कूल महेन्द्रसिंह धोनी याच्या आयुष्यावर बेतलेला ‘धोनी : दी अलटोल्ड स्टोरी’ या चित्रपटाचा मराठी ट्रेलर आज रिलीज झाला. अभिनेता रितेश देशमुख याने हा ट्रेलर लॉन्च केला. एका हिंदी बायोपिकचे प्रथमच मराठी डब व्हर्जन प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. जो धोनीला प्रमोट करत होता, धोनी आता त्यालाच बाहेर काढायला बघतोय. हा या तिघांना बाहेर काढून थांबणार नाही, असे संवाद या ट्रेलरमध्ये ऐकायला मिळतात. येत्या ३० सप्टेंबरला हिंदीसह  मराठी, तामीळ, तेलुगु भाषेत देशभरात प्रदर्शित होणार आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत हा या सिनेमात धोनीच्या भूमिकेत   दिसणार आहे. शिवाय बॉलिवूडच्या कलाकारांची भलीमोठी फौज या सिनेमात पाहायला मिळणार आहे.

Web Title: 'Dhoni: The Untold Story' Marathi Trailer Release