Dharmendra Health Update : "आता सगळं देवाच्या हातात आहे...", धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबत बोलताना हेमा मालिनी भावुक, म्हणाल्या- "मुलं रात्रभर..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 08:33 IST2025-11-13T08:32:52+5:302025-11-13T08:33:20+5:30
Dharmendra Health Update : डॉक्टरांनी धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देत त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचं सांगितलं होतं. आता घरी आल्यानंतर हेमा मालिनींनी धर्मेंद्र यांच्याबाबत हेल्थ अपडेट दिले आहेत.

Dharmendra Health Update : "आता सगळं देवाच्या हातात आहे...", धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबत बोलताना हेमा मालिनी भावुक, म्हणाल्या- "मुलं रात्रभर..."
Dharmendra Health Updates: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची तब्येत खालावल्याने त्यांना काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल केलं होतं. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या तब्येतीबाबत चाहत्यांनाही चिंता सतावत होती. बुधवारी(१२ नोव्हेंबर) डॉक्टरांनी धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देत त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचं सांगितलं होतं. याशिवाय त्यांच्यावर आता पुढचे उपचार घरीच केले जाणार असल्याची माहितीही डॉक्टरांनी दिली होती. आता घरी आल्यानंतर हेमा मालिनींनी धर्मेंद्र यांच्याबाबत हेल्थ अपडेट दिले आहेत.
हेमा मालिनींनी सुभाष झा यांच्याशी बोलताना धर्मेंद्र यांची प्रकृती आता कशी आहे, याबाबत सांगितलं. भावुक होत त्या म्हणाल्या, "माझ्यासाठी हे सोपं नाही. धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबत आम्ही सगळेच चिंतेत आहोत. त्यांची मुलं रात्रभर झोपत नाहीत. पण, मी धीर सोडू शकत नाही. माझ्यावर खूप जबाबदाऱ्या आहेत. पण, ते घरी आले यासाठी मी खूश आहे. हॉस्पिटलमधून ते बाहेर आले यामुळे आमची चिंता थोडी कमी झाली आहे. त्यांच्यासाठी प्रेम करणारे लोक आजूबाजूला असणं गरजेचं होतं. बाकी सगळं तर आता देवाच्या हातात आहे".
धर्मेंद्र यांची तब्येत सोमवारी(१० नोव्हेंबर) अचानक बिघडल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. तेव्हा त्यांच्या निधनाच्या अफवा पसरल्या होत्या. ते पाहून हेमा मालिनी चिडल्या होत्या. त्यांनी चुकीच्या बातम्या पसरवणाऱ्यांना सुनावलं होतं. पोस्ट शेअर करत हेमा मालिनी आणि ईशा देओल यांनी धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचंही म्हटलं होतं.