Get Well Soon! धर्मेंद्र यांच्या चाहत्याला अश्रू अनावर, हातात पोस्टर घेऊन केली प्रार्थना, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 11:13 IST2025-11-12T11:12:35+5:302025-11-12T11:13:16+5:30
रुग्णालयातून धर्मेंद्र यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर चाहत्यांनी त्यांच्या जुहू येथील घराबाहेर गर्दी केली आहे. धर्मेंद्र यांना लवकर बरं वाटावं यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.

Get Well Soon! धर्मेंद्र यांच्या चाहत्याला अश्रू अनावर, हातात पोस्टर घेऊन केली प्रार्थना, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
Dharmendra: ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र गेल्या काही दिवसांपासून प्रकृतीच्या कारणास्तव हॉस्पिटलमध्ये दाखल होते. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून ते उपचारांना प्रतिसाद देत असल्याची माहिती कुटुंबीयांकडून देण्यात आली होती. धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना आज(१२ नोव्हेंबर) सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
सनी देओल आणि बॉबी देओल धर्मेंद्र यांना घेऊन घरी आले आहेत. रुग्णालयातून धर्मेंद्र यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर चाहत्यांनी त्यांच्या जुहू येथील घराबाहेर गर्दी केली आहे. धर्मेंद्र यांना लवकर बरं वाटावं यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत. धर्मेंद्र यांच्या घराबाहेरून एका चाहत्याचा व्हिडीओ समोर आला आहे. हा चाहता हातात पोस्टर घेऊन धर्मेंद्र यांच्यासाठी प्रार्थना करत आहे. या पोस्टरवर धर्मेंद्र यांचा फोटो आहे. "देवा धर्मेंद्र यांना लवकर बरं कर", असं पोस्टरवर लिहिलं आहे.
धर्मेंद्र यांचा हा चाहता त्यांची काही गाणीही म्हणत आहे. त्यानंतर त्याला अश्रू अनावर झाल्याचं दिसत आहे. हा भावुक करणारा व्हिडीओ पाहून धर्मेंद्र यांच्या इतर चाहत्यांचे डोळेही पाणावले आहेत. या व्हिडीओवर कमेंट करत चाहत्यांनीही धर्मेंद्र यांच्यासाठी प्रार्थना केल्या आहेत.