डोक्यावर ग्लास अन्...; लेकाच्या 'जमाल कुडु' गाण्यावर धर्मेंद्र यांचा जबरा डान्स, सलमानही थिरकला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2023 12:58 PM2023-12-31T12:58:17+5:302023-12-31T12:59:52+5:30

बॉबी देओलच्या जमाल कुडुवर धर्मेंद्र थिरकले, सलमान खानही झाला थक्क

dharmendra dance with salman khan on animal movie bobby deol jamal kudu song video viral | डोक्यावर ग्लास अन्...; लेकाच्या 'जमाल कुडु' गाण्यावर धर्मेंद्र यांचा जबरा डान्स, सलमानही थिरकला

डोक्यावर ग्लास अन्...; लेकाच्या 'जमाल कुडु' गाण्यावर धर्मेंद्र यांचा जबरा डान्स, सलमानही थिरकला

रणबीर कपूरच्या 'ॲनिमल' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. यंदाच्या वर्षातील ब्लॉकबस्टर ठरलेल्या सिनेमांच्या पंगतीत 'ॲनिमल' जाऊन बसला आहे. 'ॲनिमल'मधील डायलॉग्स आणि सीन्सप्रमाणेच या सिनेमातील गाण्यांनीही प्रेक्षकांना वेड लावलं. या चित्रपटातील बॉबी देओलच्या एन्ट्रीचं 'जमाल कुडु' हे गाणं प्रचंड व्हायरल झालं. अनेक सेलिब्रिटींनाही या गाण्यावर रील बनवण्याचा मोह आवरता आलेला नाही. 

सनी देओलनेही बॉबी देओलच्या या गाण्यावर रील बनवली होती. आता धर्मेंद्र यांनी लेकाच्या 'जमाल कुडु' गाण्यावर डान्स केला आहे. त्यांचा व्हिडिओ समोर आला आहे. धर्मेंद्र 'बिग बॉस १७'च्या रविवारच्या भागात हजेरी लावणार आहेत. 'बिग बॉस'च्या स्टेजवर धर्मेंद्र आणि सलमान यांनी जमाल कुडु गाण्यावर डान्स केला. लेकाच्या गाण्यावर धर्मेंद्र यांनी ठुमके लावले. तर सलमान बॉबी देओलच्या स्टाइलमध्ये डोक्यावर ग्लास घेत जमाल कुडुवर थिरकला. 

सलमान आणि धर्मेंद्र यांच्याबरोबर अरबाज, सोहेलनेही 'जमाल कुडु' गाण्यावर डान्स केला. 'बिग बॉस'मधील त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  या व्हिडिओवर बॉबी देओलने हार्ट इमोजी पोस्ट करत कमेंट केली आहे. 

Web Title: dharmendra dance with salman khan on animal movie bobby deol jamal kudu song video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.