धनुष-क्रितीच्या 'तेरे इश्क मे'च्या टीझरमध्ये दिसतोय प्रेमातील विश्वासघाताचा थरार; अंगावर शहारा आणणारे दर्दी संवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 12:21 IST2025-10-01T12:20:38+5:302025-10-01T12:21:35+5:30

Tere Ishq Mein Teaser: 'तेरे इश्क मे'चा २ मिनीट ४ सेकंदाचा ट्रेलर पहिल्या सीनपासूनच खिळवून ठेवतो.

dhanush and kriti sanon starrer tere ishq mein teaser released directed by anand l rai | धनुष-क्रितीच्या 'तेरे इश्क मे'च्या टीझरमध्ये दिसतोय प्रेमातील विश्वासघाताचा थरार; अंगावर शहारा आणणारे दर्दी संवाद

धनुष-क्रितीच्या 'तेरे इश्क मे'च्या टीझरमध्ये दिसतोय प्रेमातील विश्वासघाताचा थरार; अंगावर शहारा आणणारे दर्दी संवाद

Tere Ishq Mein Teaser: दिग्दर्शक आनंद एल राय आणि अभिनेता धनुष ही जोडी म्हटलं की 'रांझणा' डोळ्यासमोर येतो. या सिनेमाने हिंदी सिनेसृष्टीच्या इतिसाहासात वेगळं स्थान निर्माण केलं. आता हीच जोडी पुन्हा पडद्यावर येत आहे. धनुषच्या आगामी 'तेरे इश्क मे'चा टीझर काही वेळापूर्वीच आला आहे. यावेळी सिनेमात क्रिती सेनन मुख्य अभिनेत्री आहे. रांझणा कुंदन आता शंकरच्या रुपात समोर येत आहे. शंकर आणि मुक्तीची प्रेमभंग आणि हिंसक अशी लव्हस्टोरी पाहायला मिळणार आहे.
 
'तेरे इश्क मे'चा २ मिनीट ४ सेकंदाचा ट्रेलर पहिल्या सीनपासूनच खिळवून ठेवतो. मुक्तीच्या(क्रिती सेनन) हळदीचा कार्यक्रम सुरु असतो. समोरुन शंकर(धनुष) जखमी अवस्थेत, डोळ्यात आग घेऊन समोरुन चालत येत असतो. मुक्ती त्याला पाहून शॉक होते.'अपने पिता तो बनारस मे जलाके आया हूँ, सोचा तेरे लिये गंगाजल लेता हूँ. नयी जिंदगी शुरु कर रही है, पुराने पाप तो धोले' असा जबरदस्त डायलॉग बोलतो. मुक्तीच्या डोक्यावर गंगाजल ओततो. नंतर धनुषचा अॅक्शन अवतार, क्रितीचा सिगारेट आणि दारुमध्ये बुडालेला सीन आणि शेवटी मुक्ती-शंकरच्या प्रेमातील आगीचा थरारक सीन आहे. 'शंकर करे तेरे घर बेटा हो, तुझे पता चले इश्क मे जो मर जाते है वो भी किसी के बेटे होते है' असा एक धनुषचा शेवटचा डायलॉग अंगावर काटा आणणारा आहे. 

तेरे इश्क मे टीझर | Tere Ishq Mein Teaser

सिनेमाला ए.आर रहमानने संगीत दिलं आहे. टीझरला बॅकग्राऊंडमध्ये 'तेरे इश्क मे क्या से क्या बना, तेरे इश्क मे हो रहा फना' हे गाणं वाजतं. धनुषने 'रांझणा'मध्ये कुंदनच्या रुपात सर्वांना प्रेमात पाडलं. आता शंकरच्या रुपात त्याने या सिनेमात आग लावली आहे. काही सेकंदाच्या टीझरमध्ये त्याच्या अभिनयाची ताकद दिसतेय तर क्रिती सेननही त्याच्या तोडीस तोड दिसत आहे. एकूणच प्रेम, विरह, विश्वासघात अशी तडकती भडकती ही प्रेमकहाणी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  २८ नोव्हेंबर रोजी सिनेमा रिलीज होणार आहे.

Web Title : धनुष-कृति के 'तेरे इश्क में' टीज़र में प्रेम और विश्वासघात का तांडव।

Web Summary : 'तेरे इश्क में' में धनुष और कृति सेनन प्यार, धोखे और हिंसा की कहानी लेकर आ रहे हैं। टीज़र में बदला लेने की आग लिए धनुष, कृति के विवाह समारोह को भंग करते हुए दिखाई दे रहे हैं, जो एक दुखद प्रेम कहानी का संकेत है। फिल्म 28 नवंबर को रिलीज होगी।

Web Title : Betrayal and rage ignite in Dhanush-Kriti's 'Tere Ishk Mein' teaser.

Web Summary : Dhanush and Kriti Sanon star in 'Tere Ishk Mein,' a story of love, betrayal, and violence. The teaser shows a revenge-filled Dhanush disrupting Kriti's wedding rituals, hinting at a tragic love story filled with powerful dialogues and AR Rahman's music. Releasing November 28th.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.