'आदित्य ठाकरे' नावामुळे घोळ! लायसन्स पाहून अभिनेत्याला पोलिसांनी अडवलं, आधार कार्ड पाहिलं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 13:25 IST2025-08-13T12:32:12+5:302025-08-13T13:25:26+5:30

अभिनेत्याचं नावही आदित्य ठाकरेच असल्याने पोलीस त्याला सोडायला तयारच नव्हते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मराठमोळा अभिनेता आदित्य ठाकरेने हा नावामुळे झालेला घोळ आणि मजेशीर किस्सा सांगितला. 

dhadak 2 actor and reel star aditya thakare shared incidence happened because of name similarity shivsena leader aaditya thackeray | 'आदित्य ठाकरे' नावामुळे घोळ! लायसन्स पाहून अभिनेत्याला पोलिसांनी अडवलं, आधार कार्ड पाहिलं अन्...

'आदित्य ठाकरे' नावामुळे घोळ! लायसन्स पाहून अभिनेत्याला पोलिसांनी अडवलं, आधार कार्ड पाहिलं अन्...

आदित्य ठाकरे हे नाव महाराष्ट्रासाठी काही नवं नाही. ठाकरे घराण्याचा राजकीय वारसा लाभलेले आदित्य ठाकरे राजकारणात सक्रिय असून आमदार आहेत. पण, त्यांच्या या नावामुळेच एका अभिनेत्याला मात्र पकडलं होतं. अभिनेत्याचं नावही आदित्य ठाकरेच असल्याने पोलीस त्याला सोडायला तयारच नव्हते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मराठमोळा अभिनेता आदित्य ठाकरेने हा नावामुळे झालेला घोळ आणि मजेशीर किस्सा सांगितला. 

सोशल मीडियावर कॉमेडी व्हिडीओ बनवून प्रसिद्धी मिळवेला रीलस्टार आदित्य ठाकरेने 'धडक २' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.  'धडक २'मध्ये आदित्यने वासू ही कॉलेज स्टुडंटची भूमिका साकारली आहे. त्याने सिद्धांत चतुर्वेदी आणि तृप्ती डिमरीसोबत स्क्रीन शेअर केली आहे. या सिनेमाच्या निमित्ताने आदित्यने महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत आदित्य ठाकरे नावामुळे घडलेला एक मजेशीर किस्सा शेअर केला. 


कॉलेजमध्ये असताना आदित्यला एकदा ट्राफिक पोलिसांनी पकडलं होतं. त्याच्या ड्रायव्हिंग लायसन्सवरील फोटो ब्लर झाला होता. पोलिसांना वाटलं की अभिनेता आदित्य ठाकरे नावाचं खोटं लायसन्स घेऊन फिरतो आहे. आदित्य म्हणाला, "मी त्यांची खूप वेळा माफी मागितली. शेवटी आधार कार्ड दाखवल्यावर त्यांचा विश्वास बसला. त्यानंतर तेदेखील खूप हसत होते". 

Web Title: dhadak 2 actor and reel star aditya thakare shared incidence happened because of name similarity shivsena leader aaditya thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.