"गड-किल्ले पण साफ करा", राम मंदिरात साफसफाई करणाऱ्या अमृता फडणवीसांना नेटकऱ्यांचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 06:32 PM2024-01-18T18:32:19+5:302024-01-18T18:38:22+5:30

अमृता फडणवीसांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे.  

Devendra Fadnavis Wife Amruta Fadnavis Trolled For Cleaning Mumbai's Oldest Ram Temple Video viral | "गड-किल्ले पण साफ करा", राम मंदिरात साफसफाई करणाऱ्या अमृता फडणवीसांना नेटकऱ्यांचा सल्ला

"गड-किल्ले पण साफ करा", राम मंदिरात साफसफाई करणाऱ्या अमृता फडणवीसांना नेटकऱ्यांचा सल्ला

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस कायमच चर्चेत असल्याचं पाहायला मिळतं. अमृता या सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असतात. या माध्यमातून त्या कायम चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. सध्या सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात अमृता फडणवीस या राम मंदिराच्या पायऱ्या धुवत असल्याचे दिसत आहे. या व्हिडीओवरून आता अमृता फडणवीसांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे.  

अमृता फडणवीस यांनी इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत जॅकी श्रॉफ, अमृता फडणवीस यांच्यासारखे दिग्गज व्यक्ती दिसत आहेत. या व्हिडीओत हे कलाकार मुंबईतील एका राम मंदिराची स्वच्छता करत असल्याचे दिसत आहे. यात अमृता फडणवीसांच्या हातात झाडू व मॉब असून त्या साफसफाई करत असल्याचे पाहायला मिळत आहे. 

हा व्हिडीओ शेअर करताना अमृता यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, 'पंतप्रधान मोदी यांनी भारतवासीयांना मंदिराच्या स्वच्छतेसाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे. आपल्या परिसरातील मंदिरांना स्वच्छ ठेवण्याच्या त्यांच्या आवाहनाला अनुसरून आज मुंबईतील सर्वात जुने राम मंदिर स्वच्छ केले. स्वच्छता हाच ईश्वराच्या जवळ जाण्याचा मार्ग आहे, असे म्हटले जाते, त्याचा इथे अनुभवही आला. आज मनःशांती व देवळातील पावित्र्य जवळून अनुभवता आलं. खरंच धन्य झालो'. 

अमृता यांच्या या व्हिडिओच्या खाली कमेंट करताना काहींनी कौतुक केलं आहे तर अनेकांनी ट्रोलं केलं. 'गड किल्लेपण साफ करा. वाईट अवस्था होत चालली आहे', 'हे सगळं नाटक आहे', 'स्वतः घरामध्ये एक ग्लास तरी उचलत असाल का',अशा अनेक कमेंट्स या व्हिडीओखाली पाहायला मिळत आहेत. दरम्यान  अमृता फडणवीस या गायिका असण्यासोबतच बँकर सुद्धा आहेत. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये त्यांचं नवीन गाणं रिलीज झालं होतं. तुम्ही 'आईने की जरुरत नहीं' हे त्यांचं गाणं नेटकऱ्यांमध्ये विशेष गाजलं होतं.
 

Web Title: Devendra Fadnavis Wife Amruta Fadnavis Trolled For Cleaning Mumbai's Oldest Ram Temple Video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.