‘देवसेना’ची आई म्हणते, अनुष्कासाठी प्रभास अगदी परफेक्ट ; पण...!!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 20:19 IST2018-07-19T20:18:23+5:302018-07-19T20:19:34+5:30

साऊथचा सुपरस्टार प्रभास आणि अभिनेत्री अनुष्का शेट्टी यांच्या रिलेशनशिपच्या बातम्या आपल्यासाठी नव्या नाहीत. दोघांनीही या बातम्या अनेकदा खोडून काढल्या आहेत. पण याऊपरही या बातम्या थांबलेल्या नाहीत. 

 'Devasena's mother says, Prabhas is perfect for Anushka; But ... !! | ‘देवसेना’ची आई म्हणते, अनुष्कासाठी प्रभास अगदी परफेक्ट ; पण...!!

‘देवसेना’ची आई म्हणते, अनुष्कासाठी प्रभास अगदी परफेक्ट ; पण...!!

साऊथचा सुपरस्टार प्रभास आणि अभिनेत्री अनुष्का शेट्टी यांच्या रिलेशनशिपच्या बातम्या आपल्यासाठी नव्या नाहीत. दोघांनीही या बातम्या अनेकदा खोडून काढल्या आहेत. पण याऊपरही या बातम्या थांबलेल्या नाहीत. आता पुन्हा एकदा यांच्या अफेअरच्या चर्चांना जोर चढला आहे. यावेळी अनुष्काच्या आईने या दोघांबद्दल एक खुलासा केला आहे.

‘ते दोघेही स्टार्स आहेत़ दोघांनीही एकत्र काम केले आहे. अनुष्कासाठी मिस्टर परफेक्ट म्हणून प्रभासला निवडायला मलाही आवडेल. तो अगदी परफेक्ट आहे. पण दोघेही केवळ चांगले मित्र आहेत. त्यामुळे लोकांनी त्यांच्या अफेअरच्या बातम्या पसरवणे बंद करावे,’ असे अनुष्काची आई म्हणाली.

‘बाहुबली2’ या चित्रपटातील प्रभास व अनुष्काची केमिस्ट्री लोकांना प्रचंड आवडली होती. याच चित्रपटानंतर दोघांच्याही अफेअरच्या बातम्यांना जोर चढला होता. दोघेही लग्न करणार, इथपर्यंत ही चर्चा पुढे गेली होती. मध्यंतरी प्रभास अनुष्काला भेटायला तिच्या सेटवर पोहोचला होता. याचे फोटोही व्हायरल झाले होते. पुढे अनुष्का प्रभासबद्दल बरीच पसेसिव्ह झाल्याचेही कानावर आले होते. पण या सगळ्या अफवा निघाल्या होत्या. काही महिन्यांपूर्वी एका मुलाखतीत बोलताना प्रभासने अनुष्का त्याची केवळ चांगली मैत्रिण असल्याचे सांगितले होते. आम्ही ९ वर्षांपासून एकमेकांना ओळखतो आणि चांगले मित्र आहोत. आमच्या अफेअरच्या बातम्या ऐकून मी अनेकदा अचंबित होतो. या बातम्या इतक्या दाव्यानिशी सांगितल्या जातात की, अनेकदा मलाही आमच्यात काही आहेच, असा भास व्हायला लागतो, असे तो गमतीत म्हणाला होता.

Web Title:  'Devasena's mother says, Prabhas is perfect for Anushka; But ... !!