देसी गर्ल प्रियंका चोपडाचा स्विमिंग अंदाज तुम्हाला नक्कीच आवडेल, पहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2017 22:29 IST2017-09-29T16:21:11+5:302017-09-29T22:29:29+5:30

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोपडा हॉलिवूडमध्ये चांगलीच रमली आहे. त्यामुळे बॉलिवूडपेक्षा ती तिच्या हॉलिवूड प्रोजेक्टमुळे अधिक चर्चेत राहत आहे. ...

Desi Girl Priyanka Chopra's Swiming Estimate You Will Love, See Photos! | देसी गर्ल प्रियंका चोपडाचा स्विमिंग अंदाज तुम्हाला नक्कीच आवडेल, पहा फोटो!

देसी गर्ल प्रियंका चोपडाचा स्विमिंग अंदाज तुम्हाला नक्कीच आवडेल, पहा फोटो!

लिवूडची देसी गर्ल प्रियंका चोपडा हॉलिवूडमध्ये चांगलीच रमली आहे. त्यामुळे बॉलिवूडपेक्षा ती तिच्या हॉलिवूड प्रोजेक्टमुळे अधिक चर्चेत राहत आहे. वास्तविक प्रियंकाला तिच्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखले जाते. ती जे काही करते ते कधीच लपवित नाही. बिनधास्तपणे ती तिचा स्वभाव जगाला दाखवून देते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती तिच्या आयुष्यातील सर्व आनंदाचे क्षण तिच्या चाहत्यांसोबत शेअर करीत असते. आता असेच काहीसे फोटो तिने शेअर केले असून, त्यात तिचा हॉट अंदाज बघावयास मिळत आहे. 

प्रियंका सध्या तिच्या अमेरिकन टीव्ही शो ‘क्वांटिको’ आणि दोन हॉलिवूडपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. मात्र तिला कामातून थोडासा जरी वेळ मिळाला तरी, ती मौजमस्ती करताना आपल्या मित्रांसोबत दिसते. प्रियंकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केलेल्या या फोटोंमधून ते दिसून येत आहे. लॉस एंजेलिस येथे क्लिक करण्यात आलेल्या या फोटोंमध्ये प्रियंका स्विमिंग पूलमध्ये रिलॅक्स मुडमध्ये दिसत आहे. 



फोटोत तिचे काही मित्रही दिसत आहे. ‘क्वांटिको’मधील तिची को-स्टार यास्मीन अल मासरी हीदेखील दिसत आहे. हे फोटो शेअर करताना प्रियंकाने लिहिले की, ‘उन्हात चमकणाºया लॉस एजेंलिसमध्ये शांततेची सोबतीन मी’ वास्तविक प्रियंकाचा असा अंदाज यापूर्वीही बघावयास मिळाला आहे. जेव्हा ती मियामीला सुट्या एन्जॉय करायला गेली होती तेव्हा तिचा बीचवरील अंदाज बघण्यासारखा होता. दरम्यान, प्रियंकाने स्विमिंग पुलामधील फोटो शेअर करताना एक पुल साइड ट्रिप व्हिडीओदेखील शेअर केला आहे. 



खरं तर प्रियंका रिलॅक्स असल्याचे वाचून तिच्या चाहत्यांना नक्कीच समाधान मिळाले असेल. कारण काही दिवसांपूर्वीच तिच्या मराठी ‘व्हेंटिलेटर’ या चित्रपटाला आॅस्करसाठी नामांकन मिळाले नसल्याने ती निराश झाली होती. काही दिवसांपूर्वीच फोर्ब्स साप्ताहिकांमध्ये जाहीर केलेल्या सर्वांत कमाई करणाºया टीव्ही अभिनेत्रींच्या यादीत प्रियंका चोपडाला स्थान देण्यात आले होते. या यादीत प्रियंकाला आठवे स्थान दिले गेले. प्रियंकाची एकूण कमाई ६५ कोटी रूपये असल्याचा यामध्ये उल्लेख करण्यात आला आहे. 

Web Title: Desi Girl Priyanka Chopra's Swiming Estimate You Will Love, See Photos!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.