लॉकडाऊनमध्ये दिशा पटानी राहातेय का टायगर श्रॉफच्या कुटुंबियांसोबत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 10:30 IST2020-04-21T10:26:00+5:302020-04-21T10:30:02+5:30

दिशाचा टायगरची बहीण कृष्णासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या चर्चांना उधाण आले आहे.

Is Deha Patani staying in Lockdown with Tiger Shroff's family? | लॉकडाऊनमध्ये दिशा पटानी राहातेय का टायगर श्रॉफच्या कुटुंबियांसोबत?

लॉकडाऊनमध्ये दिशा पटानी राहातेय का टायगर श्रॉफच्या कुटुंबियांसोबत?

ठळक मुद्देकृष्णाने सांगितले आहे की, दिशा ही माझी खूप चांगली मैत्रीण असून तिच्यासोबत वेळ घालवायला मला खूप आवडतो. ती सध्या आमच्या घरात राहात नाहीये. पण तिचे घर आणि आमचे घर अगदी जवळ आहे.

टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी यांच्या अफेअरची चर्चा नेहमीच रंगलेली असते. त्यांना अनेकवेळा रेस्टॉरंटमध्ये अथवा मल्टीप्लेक्समध्ये पाहाण्यात येते. त्यामुळे या दोघांमध्ये मैत्रीपेक्षा काहीतरी जास्त असल्याचे म्हटले जाते. पण आमच्यात केवळ मैत्री असल्याचे या दोघांनी अनेकवेळा सांगितले आहे. कॉफी विथ करण या कार्यक्रमात टायगरने त्याचे वडील जॅकी श्रॉफ यांच्यासोबत काही महिन्यांपूर्वी हजेरी लावली होती. त्यावेळी करणने त्याला तू दिशाला डेट करत आहेस का असे विचारले होते. त्यावर माझे इंडस्ट्रीत खूपच कमी फ्रेंड्स आहेत. दिशा ही त्यामधीलच एक फ्रेंड आहे असे त्याने उत्तर दिले होते.

सध्या भारतात लॉकडाऊन असून प्रत्येकजण आपापल्या घरात आहे. प्रत्येक सेलिब्रेटी देखील आपल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवत आहे. या सगळ्यात दिशा टायगरच्या कुटुंबियांसोबत राहात असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. तिचा आणि टायगरची बहीण कृष्णासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या चर्चांना उधाण आले होते. पण आता या चर्चांबाबत कृष्णाने एका मुलाखतीत सांगितले आहे.

कृष्णाने मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे की, दिशा ही माझी खूप चांगली मैत्रीण असून तिच्यासोबत वेळ घालवायला मला खूप आवडतो. ती सध्या आमच्या घरात राहात नाहीये. पण तिचे घर आणि आमचे घर अगदी जवळ आहे. त्यामुळे घरातील काही आवश्यक वस्तू घ्यायला जायचे असेल तर आम्ही दोघी एकत्र जातो.

कृष्णाने काही दिवसांपूर्वी तिचा एक फोटो पोस्ट केला होता आणि या फोटोसाठी तिचा मेकअप दिशाने केला असून तो खूपच छान केला असल्याचे कॅप्शनमध्ये म्हटले होते. टायगरसोबतच दिशा ही कृष्णाची देखील खूप चांगली फ्रेंड आहे. 

Web Title: Is Deha Patani staying in Lockdown with Tiger Shroff's family?