Deepika Ranveer Wedding: और थोडा इंतजार...! आज या वेळेला दीपवीर शेअर करणारा लग्नाचे फोटो!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2018 09:52 IST2018-11-15T09:50:38+5:302018-11-15T09:52:29+5:30
ताज्या बातमीनुसार, दीपवीरच्या चाहत्यांना आणखी काही तास या नवदांम्पत्याच्या पहिल्या फोटोची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Deepika Ranveer Wedding: और थोडा इंतजार...! आज या वेळेला दीपवीर शेअर करणारा लग्नाचे फोटो!!
दीपिका पादुकोण व रणवीर सिंग दोघेही काल १४ नोव्हेंबरला लग्नबंधनात अडकले. काल दोघांनीही कोंकणी पद्धतीने विवाह केला. आज हे जोडपे सिंधी पद्धतीने विवाहबद्ध होणार आहेत. दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहण्यासाठी चाहते आतूर आहेत. दोघांनीही अद्याप एकही फोटो शेअर केला नसल्याने चाहते नाराज आहे. टिष्ट्वटरवर अनेकांनी आपली ही नाराजी व्यक्त केली आहे. तूर्तास ताज्या बातमीनुसार, दीपवीरच्या चाहत्यांना आणखी काही तास या नवदांम्पत्याच्या पहिल्या फोटोची प्रतीक्षा करावी लागणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज संध्याकाळी ६ वाजता दीपिका व रणवीर दोघेही आपल्या लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर करतील. दोघेही स्वत: हे फोटो शेअर करणार आहेत. सिंधी पद्धतीच्या विवाहानंतर आपला आनंद ते स्वत: चाहत्यांसोबत शेअर करू इच्छितात. सर्वप्रथम आज दोघांचा ‘आनंद कराज’ विधी संपन्न होणार आहे. यानंतर सिंधी पद्धतीने विवाह होणार आहे.
लग्नाचा एकही फोटो लीक होऊ नये, यासाठी दीपवीर दोघांनीही सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. या सुरक्षेवर सुमारे १ कोटी रूपयांचा खर्च करण्यात आला आहे. अर्थात याऊपरही काही फोटो लीक झाले आहेत. पण यात दीपिका व रणवीर दोघेही स्पष्ट दिसत नाहीत. कारण हे फोटो बऱ्याच दूर अंतरावरून टिपण्यात आले आहेत.
रणवीरचा एक पांढ-या शेरवानीतील फोटो लीक झाला आहे. या फोटोत रणवीर अगदी परफेक्ट दिसतो आहे. पण चाहत्यांना दोघांनीही शेअर केलेल्या फोटोची प्रतीक्षा आहे. हे फोटो शेअर होतीलच, तोपर्यंत अर्थातच प्रतीक्षा...