​दीपिकाच्या वक्तव्यावरुन करिना झाली नाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2016 12:49 IST2016-07-26T07:19:20+5:302016-07-26T12:49:20+5:30

काही दिवसांपूर्वी मीडियाने बॉलिवूड स्टार दीपिका पादुकोणला रणवीरसोबतच्या लग्नाबाबत विचारणा केली असता, मी प्रेग्नंट नाही आणि लग्नही करणार नाही, ...

Deepika's statement made her angry | ​दीपिकाच्या वक्तव्यावरुन करिना झाली नाराज

​दीपिकाच्या वक्तव्यावरुन करिना झाली नाराज


/>काही दिवसांपूर्वी मीडियाने बॉलिवूड स्टार दीपिका पादुकोणला रणवीरसोबतच्या लग्नाबाबत विचारणा केली असता, मी प्रेग्नंट नाही आणि लग्नही करणार नाही, असं म्हटलं होतं. मात्र हे विधान करिना कपूरने फारच वैयक्तिक घेतल्याचं दिसून येत आहे.

यावर करिनाने म्हटलं आहे, दीपिकाने आपल्या लग्नाबद्दलच्या अफवांवर स्पष्टीकरण देताना प्रेग्नंट आहे. म्हणण्याचं काहीच कारण नव्हतं. कारण दीपिका प्रेग्नंट आहे, असं कोणीही म्हणालेलं नाही. त्यामुळे दीपिकाला स्पष्टीकरण देताना हा साधा सेन्स असावा.

करिनाचा असा समज झाला आहे की, दीपिकाने या विधानातून आपल्याला टोमणा मारला आहे, त्यामुळं ती सध्या नाराज असल्याचं सांगितलं जात आहे. करिना प्रेग्नंट असतानाही आगामी चित्रपटाची शुटींग करणार असल्याचं सांगितलं जात आहे.

Web Title: Deepika's statement made her angry